January 24, 2025 8:04 PM January 24, 2025 8:04 PM
7
एसटी, रिक्षा आणि टॅक्सीच्या प्रवास भाड्यात वाढ
एसटी महामंडळानं प्रवासभाड्यात केलेली १४ पूर्णांक ९७ शतांश टक्के दरवाढ आज पासून लागू असून, एक फेब्रुवारी पासून रिक्षा आणि टॅक्सीची देखील भाडेवाढ होणार आहे. ही तीन रुपयांची असेल, असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. जुन्या योजना आणि सवलती कायम राहणार असून, २ हजार कोटी रुपयांची देणी, तसंच कर्मचाऱ्यांचे पगार, या आणि इतर कारणांमुळे भाडेवाढ अपरिहार्य असल्याचं त्यांनी सांगितल.