June 21, 2025 3:06 PM June 21, 2025 3:06 PM

views 159

प्रत्यक्ष कर संकलनात गेल्या वर्षाच्या तुलनेत ४. ८६ शतांश टक्क्याने वाढ

२०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी १९ जूनपर्यंत देशाचं एकूण प्रत्यक्ष कर संकलन गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत ४ पूर्णांक ८६ शतांश टक्के वाढून सुमारे ५ लाख ४५ हजार  कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.   मात्र एकूण प्रत्यक्ष  कर संकलनात १ पूर्णांक ३९ शतांश टक्के किरकोळ घसरण नोंदवली गेली. ही घसरण प्रामुख्याने कर परताव्यात ५८ टक्के वाढ झाल्यामुळे आहे.    प्राप्तिकर विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, या कालावधीत आगाऊ कर संकलन १ लाख ५५ हजार  कोटी रुपयांपेक्षा जास्त झालं असून,  यात ३ पूर्णांक ८७ शत...

February 12, 2025 10:12 AM February 12, 2025 10:12 AM

views 11

देशाच्या प्रत्यक्ष कर संकलनात १४.६९ टक्क्यांची वाढ

देशाच्या प्रत्यक्ष कर संकलनात गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 14 पूर्णांक 69 शतांश टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती केंद्रिय प्रत्यक्ष कर मंडळानं दिली आहे. चालू आर्थिक वर्षात 17 लाख 78 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रत्यक्ष कर संकलित झाला आहे. वैयक्तिक प्राप्तीकर संकलनातही 9 लाख 47 हजार कोटी रुपयांची वाढ झाली असून 7 लाख 78 हजार कोटी रुपये भांडवली कर जमा झाला आहे.

November 12, 2024 2:34 PM November 12, 2024 2:34 PM

views 9

देशाच्या एकूण प्रत्यक्ष कर संकलनात १५ पूर्णांक ४१ शतांश टक्क्यांची वाढ

चालू आर्थिक वर्षात आत्तापर्यंत देशाच्या एकूण प्रत्यक्ष कर संकलनात १५ पूर्णांक ४१ शतांश टक्क्याची वाढ झाली आहे. हे संकलन १२ लाख १० हजार कोटी रुपयांहून अधिक झाल्याची माहिती सीबीडीटी अर्थात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं दिली आहे. कॉर्पोरेट कर संकलनातही किरकोळ वाढ झाली आहे. गेल्या वर्षी एक एप्रिल ते १० नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या कॉर्पोरेट कर संकलनात चार लाख ७९ हजार कोटी रुपयांची वाढ होऊन हे संकलन यंदाच्या वर्षात आत्तापर्यंत पाच लाख १० हजार कोटी रुपये इतकं झाल्याचं सीबीडीटीनं म्हटलं आहे.