November 9, 2025 9:03 AM

views 26

भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये राजस्व अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची – नितीन गडकरी

भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये राजस्व अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल नागपूरमध्ये बोलत होते. राजस्व संकलनाच्या प्रमाणात लोककल्याणकारी योजनांसाठी निधी उपलब्ध होतो. त्यामुळं भारतीय राजस्व सेवेतील अधिकाऱ्यांचं लोककल्याणकारी अर्थव्यवस्थेतील योगदान महत्त्वाचं आहे असं मत गडकरी यांनी व्यक्त केलं.  अकादमीचे महासंचालक एस के मॅथ्यूज, आयकर लवाद प्राधिकरणाचे...

July 14, 2025 10:07 AM

views 17

प्रत्यक्ष कर संकलनात गेल्या 10 वर्षांत 274 टक्के वृद्धी

देशातील एकूण प्रत्यक्ष कर संकलनात गेल्या दहा वर्षांत 274 टक्के वृद्धी नोंदवली गेली आहे. अर्थ मंत्रालयाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2013-14 आणि 2024-25 या दहा वर्षांच्या काळात, कर विभागाने जारी केलेल्या परताव्यात 474 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर करपरतावा दाखल करणाऱ्या करदात्यांमध्येही 133 टक्के वाढ झाली आहे. डिजीटल पायाभूत सुविधांचा अवलंब केल्यामुळे कर प्रशासनातील परिवर्तन दिसून आल्याचंही विभागानं नमूद केलं आहे.

June 21, 2025 3:06 PM

views 125

प्रत्यक्ष कर संकलनात गेल्या वर्षाच्या तुलनेत ४. ८६ शतांश टक्क्याने वाढ

२०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी १९ जूनपर्यंत देशाचं एकूण प्रत्यक्ष कर संकलन गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत ४ पूर्णांक ८६ शतांश टक्के वाढून सुमारे ५ लाख ४५ हजार  कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.   मात्र एकूण प्रत्यक्ष  कर संकलनात १ पूर्णांक ३९ शतांश टक्के किरकोळ घसरण नोंदवली गेली. ही घसरण प्रामुख्याने कर परताव्यात ५८ टक्के वाढ झाल्यामुळे आहे.    प्राप्तिकर विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, या कालावधीत आगाऊ कर संकलन १ लाख ५५ हजार  कोटी रुपयांपेक्षा जास्त झालं असून,  यात ३ पूर्णांक ८७ शत...

April 24, 2025 8:08 PM

views 30

अमेरिकेसोबत आयात शुल्काबाबत चर्चा झाल्याचं वृत्त चीननं फेटाळलं

अमेरिकेसोबत आयात शुल्काबाबत चर्चा झाल्याचं वृत्त चीननं फेटाळून लावलं आहे. अमेरिकेसोबत कोणत्याही वाटाघाटी सुरू नाही तसंच कोणतेही करार केला जात नाहीत, असं चीनचे परराष्ट्र मंत्रायलायाचे प्रवक्त गुओ जियाकुन यांनी सांगितलं. आयुक्त शुल्काची लढाई अमेरिकेने सुरू केली आहे. चीन याबाबत चर्चा करायला तयार आहे, मात्र चर्चा करताना परस्पर आदर, समानता आणि दोघांचंही समान हीत असणं आवश्यक आहे, असं गुओ यांनी स्पष्ट केलं. चीन आणि अमेरिका यांच्यात चर्चा सुरू असल्याचं वृत्त अमेरिकन माध्यमांनी दिल्याच्या पार्श्वभूमीवर च...

April 3, 2025 3:15 PM

views 24

भारतातून आयात होणाऱ्या मालावर २६ % शुल्क आकारण्याची अमेरिकेची घोषणा

अमेरिकेत भारतातून आयात होणाऱ्या मालावर २६ टक्के शुल्क आकारण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.  भारतात अमेरिकी मालावर लावल्या जाणाऱ्या शुल्काचं प्रत्युत्तर म्हणून हे शुल्क आकारण्यात येणार असल्याचं त्यांनी पत्रकारपरिषदेत सांगितलं. इतरही अनेक देशांकडून अमेरिकेत आयात होणाऱ्या मालावर अशा प्रकारचं प्रत्युत्तर शुल्क अमेरिकेनं लावलं आहे. युरोपिय महासंघाकडून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर वीस टक्के तर ब्रिटनमधून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर दहा टक्के इतकं शुल्क लावण्यात आलं आहे....

March 1, 2025 3:33 PM

views 20

कराद्वारे गोळा होणारा महसूल अधिक सक्षमतेने वापरता येत असल्याचं अर्थमंत्र्यांच प्रतिपादन

आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सरकारकडे कराद्वारे गोळा होणारा महसूल अधिक सक्षमतेने वापरता येत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. एकोणपन्नासाव्या नागरी लेखा दिनानिमित्त आज नवी दिल्ली इथं आयोजित कार्यक्रमात आज त्या बोलत होत्या.   सरकारी योजनांचा पैसा देशातल्या ६० कोटी लाभधारकांपर्यंत सार्वजनिक लेखा यंत्रणेमार्फत पोहचवण्यात येत आहे. एक हजार २११ योजनांपैकी अकराशे योजनांचा निधी थेट लाभ हस्तांतरणाने लाभार्थ्यांना दिला जातो. या खेरीज सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीव...