November 22, 2025 7:20 PM

views 43

ताडोबा व्याघ्र प्रकल्प परिसरातल्या ८०० एकर जागेचं पर्यावरणीय पुनरूज्जीवन लवकरच होणार

ताडोबा व्याघ्र प्रकल्प परिसरातल्या ८०० एकर जागेचं पर्यावरणीय पुनरूज्जीवन वन विभाग लवकरच करणार असून या प्रकल्पाला झिरोधा कंपनी आणि रेनमॅटर फाऊंडेशन आर्थक सहाय्य करणार आहेत. जंगल, गवताळ प्रदेश किंवा जलक्षेत्रात मानवी हस्तक्षेप कमीत कमी ठेवून तेथील नैसर्गिक भूभाग, वन्यजीव आणि जैवविविधतेचं पुनरूज्जीवर या प्रकल्पाद्वारे केलं जाणार आहे. यासाठी झिरोधा कंपनीकडून शंभर कोटींचा झिरोधा रिवाइल्डिंग निधी उभारण्यात आला आहे. विदर्भातील पर्यावरणाच्या संवर्धनासाठी रिवाइल्डिंगसारखे प्रकल्प उपयुक्त आहे. अशा कामांमध...