April 10, 2025 10:48 AM April 10, 2025 10:48 AM

views 8

अमेरिकेने लादलेल्या परस्पर शुल्कांचे परिणाम भारत काळजीपूर्वक तपासत आहे- परराष्ट्र मंत्रालय

अमेरिकेने लादलेल्या परस्पर शुल्कांचे परिणाम भारत काळजीपूर्वक तपासत असल्याचं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. नवी दिल्लीत माध्यमांशी बोलतांना मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी - भारत आणि अमेरिका परस्पर फायदेशीर, बहु-क्षेत्रीय द्विपक्षीय व्यापार करारावर काम करत असल्याचं सांगितलं.

April 10, 2025 10:43 AM April 10, 2025 10:43 AM

views 6

चीन वगळता सर्व देशांसाठीच्या प्रत्युत्तर करावर ९० दिवसांचा विराम देण्याची अमेरिकेची घोषणा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन वगळता सर्व देशांसाठीच्या प्रत्युत्तर करावर ९० दिवसांचा विराम देण्याची घोषणा केली आहे. एका समाज माध्यमावरील संदेशात, ९० दिवसांची ही सवलत प्रत्युत्तर करावर आणि १० टक्के करांवर लागू होईल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. आमच्या कर योजनेचा भाग म्हणून या कराला ९० दिवसांचा विराम देण्यात येत आहे, मात्र चीनसाठीचा कर तात्काळ १२५ टक्क्यांपर्यंत वाढवत आहोत असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. चीनने जागतिक बाजारपेठेला दाखवलेल्या अनादरामुळे - अमेरिकेने चीनवर आकारलेला प्रत्युत्तर...