September 12, 2024 1:25 PM September 12, 2024 1:25 PM

views 11

संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेनं भारताची वाटचाल वेगानं होत असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन

  संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेनं भारताची वाटचाल वेगानं होत असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. भारतीय हवाई दलातर्फे राजस्थानात जोधपूर इथं आयोजित तरंग शक्ती विमान सरावाची पाहणी केल्यानंतर आज ते बोलत होते. या सरावाच्या निमित्तानं हवाई दलानं आयोजित केलेल्या भारतीय संरक्षण हवाई प्रदर्शन म्हणजे आयडॅक्स-२४ चं उद्घाटन  संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते झालं. आजपासून चौदा तारखेपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात विमानविषयक सामुग्री उत्पादन क्षेत्रातल्या कंपन्यांचा मोठा ...

August 13, 2024 7:55 PM August 13, 2024 7:55 PM

views 7

तरंग शक्ती सरावादरम्यान स्वदेशी बनावटीच्या तेजस लढाऊ विमानानं दाखवली आपल्या क्षमतेची झलक

तरंग शक्ती या, देशातल्या सर्वात मोठ्या बहुराष्ट्रीय लष्करी सरावादरम्यान तेजस या स्वदेशी बनावटीच्या हलक्या लढाऊ विमानानं जगातल्या अत्याधुनिक लढाऊ विमानांच्या बरोबरीनं आपल्या क्षमतेची झलक दाखवली. तमिळनाडूच्या सुलूर हवाई तळावर झालेल्या या सरावात राफेल, युरोफायटर टायफून यासारख्या परदेशी लढाऊ विमानांच्या जोडीनं तेजसनं भरारी घेतली. एकंदर ११ देशांच्या लष्करांनी या सरावात सहभाग घेतला आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्सनं विकसित केलेलं तेजस हे त्याच्या प्रवर्गातलं सगळ्यात कमी वजनाचं लढाऊ विमान आहे.