August 6, 2024 1:30 PM August 6, 2024 1:30 PM
6
तामिळनाडूमधल्या सुलार इथं ‘तरंग शक्ती 2024’ या पहिल्या बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सरावाला आजपासून प्रारंभ
तामिळनाडूमधल्या सुलार इथं 'तरंग शक्ती २०२४' हा पहिला बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सराव आजपासून सुरु होत आहे. या सरावात भारताबरॊबर अमेरीका, जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, युएई आणि सिंगापूर सह एकूण ३० देश सहभागी होत आहेत. हा सराव दोन टप्प्यांत होणार असून आज सुरु झालेला पहिला टप्पा येत्या १४ ऑगस्टपर्यंत तामिळनाडूमध्ये, तर दुसरा टप्पा २९ ऑगस्ट ते २४ सप्टेंबर दरम्यान राजस्थानमधल्या जोधपूर इथं होणार आहे, अशी माहिती भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख, एअर मार्शल ए पी सिंग यांनी काल नवी दिल्लीत दिली. भारताची त...