November 29, 2025 1:29 PM

views 31

निलगिरी प्रकारातली तारागिरी युद्धनौका भारतीय नौदलाकडे सुपूर्द

निलगिरी प्रकारातील तारागिरी युद्धनौका काल भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आली. माझगाव डॉक शिपबिल्डिंग लिमिटेड कंपनीनं तयार केलेली ती भारतीय बनावटीची तिसरी युद्धनौका आहे. वॉरशिप डिझाइन ब्युरोने या जहाजाची रचना केली आहे आणि मुंबईच्या वॉरशिप ओव्हरसीइंग टीमच्या देखरेखीत ते तयार झाले आहे.   भारतीय नौदलाच्या ताफ्यात ३३ वर्षे अखंड सेवा दिलेल्या आयएनएस तारागिरीचेच हे पुनर्निमाण आहे. आयएनएस तारागिरी हे जहाज १६ मे १९८० ते २७ जून २०१३ या कालावधीत नौदलाचा भाग होते.