August 25, 2024 1:37 PM August 25, 2024 1:37 PM

views 12

भारताच्या तन्वी पात्रीनं १५ वर्षांखालील बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या एकेरीचं विजेतेपद पटकावलं

चीनमध्ये चेंगडूू इथं सुरू असलेल्या आशिया १७ आणि १५ खालील कनिष्ठ गट बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या तन्वी पात्रीनं १५ वर्षांखालील मुलींच्या एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. तन्वीने अंतिम लढतीत व्हिएतनामच्या गुयेन थि थू ह्युगेनचा २२-२०, २१-११ असा पराभव केला.   १७ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत, ग्यान दत्तूला मात्र कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या रादिथ्या बायु वारदानाकडून त्याला ९-२१, २१-१३, २१-१३ असा पराभव पत्करावा लागला.