December 19, 2024 2:50 PM December 19, 2024 2:50 PM
17
प्रसिद्ध तबलावादक पं. स्वपन चौधरी यांना राष्ट्रीय तानसेन सन्मान प्रदान
मध्ये प्रदेशमध्ये ग्वाल्हेर इथे आयोजित जगप्रसिद्ध तानसेन महोत्सवात काल राष्ट्रीय तानसेन पुरस्कार आणि राजा मानसिंग तोमर पुरस्कार प्रदान करण्यात आले. भारतीय शास्त्रीय संगीतातले प्रसिद्ध तबलावादक पंडित स्वपन चौधरी यांना सन २०२३साठी राष्ट्रीय तानसेन सन्मान प्रदान करण्यात आला. पाच लाख रुपये रोख, सन्मान चिन्ह आणि शाल-श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. तर इंदूर इथल्या सानंद न्यास या संस्थेला सन २०२३साठी राजा मानसिंग तोमर सन्मान प्रदान करण्यात आला. ही संस्था गेली ३५ वर्षं इंदूरमध्ये शास्त्रीय संगीत क...