April 13, 2025 8:06 PM

views 23

टँकरचालकांच्या संपामुळे मुंबईत आपत्कालीन कायदा लागू

केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नवीन नियमावली विरोधात मुंबईतल्या टँकर चालकांचा संप सुरुच असल्यानं, मुंबई महानगरपालिका प्रशासनानं २००५ चा आपत्कालीन व्यवस्थापन कायदा लागू करायचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत पालिकेच्या वतीनं शहरातल्या सर्व विहिरी, कूपनलिका आणि खासगी पाणीपुरवठा करणारे टँकर्स अधिग्रहित केल्या जाणार आहेत. व्यापक जनहितासाठी हा निर्णय घेतल्याचं पालिकेनं म्हटलं आहे. या निर्णयामुळे आता खासगी गृहनिर्माण संस्था आणि इतरांना टँकरद्वारे सुरळीतपणे पाणीपुरवठा करणं शक्य होईल असं पालिकेनं म्हटलं आहे....