December 25, 2025 2:27 PM December 25, 2025 2:27 PM

views 2

तमिळनाडूत तिरुचिरापल्ली-चेन्नई राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात ७ जणांचा मृत्यू

तमिळनाडूत तिरुचिरापल्ली-चेन्नई राष्ट्रीय महामार्गावर काल अपघात होऊन ७ जणांचा मृत्यू झाला. तमिळनाडू राज्य परिवहन मंडळाच्या बसचं टायर फुटल्यानं चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि ही बस दोन कारवर आदळली. यात कारमधून प्रवास करणारे सात जण जागीच ठार झाले.