November 17, 2025 2:54 PM November 17, 2025 2:54 PM

views 16

प्रधानमंत्री तामिळनाडूमधील मेळाव्यात उपस्थित राहणार

तामिळनाडूमध्ये कोइम्बतूर इथं दक्षिण भारतीय जैविक कृषी महासंघातर्फे १९, २० आणि २१ नोव्हेंबरला मेळावा होणार आहे. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत.    ते ५० कृषी शास्त्रज्ञांशी चर्चा करतील असं शेतकरी संघटनांचे समन्वयक पी आर पांडियन यांनी सांगितलं. या मेळाव्यात तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, पद्दुचेरीसह इतर राज्यांमधून पाच हजारापेक्षा जास्त शेतकरी सहभागी होणार आहेत.

October 21, 2025 12:32 PM October 21, 2025 12:32 PM

views 50

तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागानं येत्या चार दिवसांसाठी तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढचे दोन दिवस पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, पुद्दुचेरीमधे माहे, लक्षद्वीप आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर उद्या मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.  कर्नाटकाचा अंतर्गत भाग, केरळ, लक्षद्वीप, ओडिशा, तेलंगणा आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर आज विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

July 26, 2025 1:32 PM July 26, 2025 1:32 PM

views 44

तमिळनाडूमधे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन

 मालदीव दौऱ्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी दोन दिवसांच्या तमिळनाडू दौऱ्यासाठी तुतिकोरीन इथं पोहोचतील. तुतिकोरीन विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचं उद्घाटन ते करतील. तसंच ४ हजार ६०० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.   अरियालूर जिल्ह्यातल्या गंगईकोंडा चोलापुरम मंदिरात चोल सम्राट राजेंद्र चोल पहिले यांच्या स्मरणार्थ आयोजित आदि थिरुवादिरई उत्सवातही प्रधानमंत्री सहभागी होतील. राजेंद्र चोल यांनी आग्नेय आशियावर समुद्रमार्...

June 19, 2025 1:22 PM June 19, 2025 1:22 PM

views 14

तामिळनाडूच्या तिरुपूर इथून आज २६ बांग्लादेशी नागरिक अटक

तामिळनाडूच्या तिरुपूर इथून आज २६ बांग्लादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. पल्लदम इथं काही नागरिक बेकायदा वास्तव्य करत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानंतर त्यांच्या घरांवर छापा घातला असता, बनावट कागदपत्रे, आधार कार्ड आढळून आले. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

April 12, 2025 9:34 AM April 12, 2025 9:34 AM

views 16

तमिळनाडूत एआयएडीएमके आणि रालोआ आघाडीची युती

तामिळनाडूत अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम पक्षानं राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युतीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.   मोदींनी त्यांच्या समाजमाध्यमांवरील संदेशात, रालोआ आघाडीच्या इतर भागीदारांसह तामिळनाडूच्या प्रगतीसाठी परिश्रम करतील आणि राज्याला प्रगतीच्या नव्या शिखरावर घेऊन जातील असं म्हटलं आहे. 

December 19, 2024 10:03 AM December 19, 2024 10:03 AM

views 12

बहारिनमध्ये अटक २८ भारतीय मच्छिमार मायदेशी परतले

बहारिनमध्ये अटक करण्यात आलेल्या २८ भारतीय मच्छिमारांना मायदेशी परत आणण्यात आलं आहे. तमिळनाडूतल्या या मच्छिमारांना गेल्या सप्टेंबर महिन्यात बहारिनच्या सागरी हद्दीत अवैधरित्या प्रवेश केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. या सर्वांच्या सुटकेसाठी तिथल्या भारतीय दूतावासानं यशस्वी प्रयत्न केले. या सर्वांना अटकेत असताना दूतावासानं सर्व प्रकारची मदत केली तसंच भारतात परतण्याचा प्रवास खर्चदेखील केला.

December 13, 2024 1:09 PM December 13, 2024 1:09 PM

views 18

तमिळनाडूमधे रुग्णालयात लागलेल्या आगीत एका बालकासह सहा जणांचा मृत्यू, २६ जण जखमी

तमिळनाडूमधील दिंडीगुल इथे एका रुग्णालयात काल रात्री लागलेल्या आगीत एका बालकासह सहा जणांचा मृत्यू झाला, तर २६ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तीन जण अतिदक्षता विभागात असून अन्य रुग्णांवर उपचार करून सोडून देण्यात आले. रुग्णालयाच्या तळ मजल्यावर लागलेली ही आग शार्ट सर्किटमुळे लागल्याचे समजते. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना तीन लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले आहे.

October 17, 2024 10:49 AM October 17, 2024 10:49 AM

views 5

तामिळनाडूमध्ये आज अति मुसळधार पावसाचा अंदाज

तामिळनाडूजवळ चेन्नईपासून 320 किलोमीटर वर समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून त्याचा परिणाम म्हणून तामिळनाडूमध्ये आज मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.   चेन्नई, कांचीपुरम, तिरूवल्लुर आणि चेंगलापेट जिल्ह्यांमध्ये दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. तमिळनाडू प्रशासन संभाव्य आपत्कालीन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तटरक्षक दल तसंच राज्य आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

October 14, 2024 8:22 PM October 14, 2024 8:22 PM

views 7

पावसाच्या पार्श्वभूमीवर तमिळनाडू प्रशासनाकडून तयारीचा आढावा

तमिळनाडूतल्या चार जिल्ह्यात १७ ऑक्टोबरपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा आज मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी घेतला.    बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं राज्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज राज्याच्या हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे दक्षिण आंध्रप्रदेश आणि उत्तर तामिळनाडूत दरड कोसळण्याचीही शक्यता आहे. मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत चेन्नई, कांचीपुरम, तिरुवलुर आणि चेंगलपट्टू इथल्या शाळांना उद्या सुट्टी देण्याचा नि...

August 6, 2024 1:30 PM August 6, 2024 1:30 PM

views 7

तामिळनाडूमधल्या सुलार इथं ‘तरंग शक्ती 2024’ या पहिल्या बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सरावाला आजपासून प्रारंभ

तामिळनाडूमधल्या सुलार इथं 'तरंग शक्ती २०२४' हा पहिला बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सराव आजपासून सुरु होत आहे. या सरावात भारताबरॊबर अमेरीका, जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, युएई आणि सिंगापूर सह एकूण ३० देश सहभागी होत आहेत. हा सराव दोन टप्प्यांत होणार असून आज सुरु झालेला पहिला टप्पा येत्या १४ ऑगस्टपर्यंत तामिळनाडूमध्ये, तर दुसरा टप्पा २९ ऑगस्ट ते २४ सप्टेंबर दरम्यान राजस्थानमधल्या जोधपूर इथं होणार आहे, अशी माहिती भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख, एअर मार्शल ए पी सिंग यांनी काल नवी दिल्लीत दिली.   भारताची त...