April 14, 2025 10:41 AM April 14, 2025 10:41 AM
1
‘पुथांडू’ या तमिळ नवीन वर्षाची सुरुवात
जगभरातल्या तमिळ भाषिक समुदायाच्या पुथांडू या तमिळ नवीन वर्षाची सुरुवात आज होत आहे. तमिळ महिन्याच्या चिथिराईच्या पहिल्या दिवशी पुथांडू साजरा केला जातो. या सणानिमित्त मंदिरांमधून धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं, तसंच घरोघरी इडली वडा पायसमसह चविष्ट पारंपारिक पदार्थांची आज रेलचेल असते.