December 1, 2025 1:31 PM December 1, 2025 1:31 PM

views 2

तामिळनाडूमध्ये रस्ते अपघातात ११ जणांचा मृत्यू

तामिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यात दोन बस एकमेकांवर समोरासमोर धडकून झालेल्या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला असून ५४ जण जखमी झाले आहेत. शिवगंगा जिल्ह्यातल्या तिरुपात्तुल भागातल्या पिलायरपाटी जवळ हा अपघात झाला. तिरप्पुर ते काराईकुडु जाणारी बस कारायकुडी ते डिंडीगुल जिल्ह्यात जाणाऱ्या बसला समोरसमोर धडकली. स्थानिकांनी जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं.    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांन...

October 1, 2025 9:36 AM October 1, 2025 9:36 AM

views 19

तमिळनाडूमध्ये औष्णिक ऊर्जा प्रकल्पात बांधकाम सुरू असलेली एक कमान कोसळून ९ मजुरांचा मृत्यू

तमिळनाडूमध्ये एन्नोर भेल औष्णिक ऊर्जा प्रकल्पात बांधकाम सुरू असलेली एक कमान कोसळून नऊ मजुरांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. मृतांमधील बहुतेक जण आसाममधील आहेत. जखमींना स्टॅनले सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी मृतांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.

June 27, 2025 11:07 AM June 27, 2025 11:07 AM

views 14

हॉकी इंडिया मास्टर्स करंडक स्पर्धेत, पुरुष गटात अंतिम लढत महाराष्ट्र आणि तमिळनाडू यांच्यात होणार

हॉकी इंडिया मास्टर्स करंडक स्पर्धेत, पुरुष गटात अंतिम लढत आज महाराष्ट्र आणि तमिळनाडू यांच्यात होणार आहे. आज संध्याकाळी चेन्नई इथं चार वाजता हा सामना होणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीत, तमिळनाडूनं चंदीगडचा 3-0 असा पराभव केला तर दुसऱ्या उपांत्य फेरीत, महाराष्ट्राने ओडिशाविरुद्ध 4-1 असा विजय मिळवला. दरम्यान, महिलांच्या गटात आज अंतिम सामना ओडिशा आणि पंजाब यांच्यात होणार असून, चेन्नईमध्ये आज दुपारी दोन वाजता हा सामना होईल. पहिल्या उपांत्य फेरीत, ओडिशानं तमिळनाडूचा 4-1 असा पराभव केला, तर दुसऱ्या उपांत्य...

February 7, 2025 2:21 PM February 7, 2025 2:21 PM

views 16

श्रीलंकन अधिकाऱ्यांनी तामिळनाडूतल्या मच्छिमारांना ताब्यात घेतल्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांच्या खासदारांकडून निदर्शनं

श्रीलंकन अधिकाऱ्यांनी तामिळनाडूतल्या मच्छिमारांना ताब्यात घेतल्याच्या मुद्द्यावरून आज विरोधी पक्षांच्या खासदारांनी निदर्शनं केली. श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी तामिळनाडूतल्या ९७ मच्छिमारांना अटक केली असून त्यांना परत आणलं पाहिजे, असा मुद्दा द्रमुक खासदार कनिमोळी यांनी लोकसभेत शून्य प्रहरात उपस्थित केला. लोकसभेत सध्या आगामी आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे.

December 6, 2024 8:07 PM December 6, 2024 8:07 PM

views 9

फेंगल चक्रीवादळाने बाधित तामिळनाडूसाठी ९४४ कोटी रुपयांचं अर्थसाहाय्य

फेंगल चक्रीवादळाने बाधित तामिळनाडूसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने ९४४ कोटी रुपयांचं अर्थसाहाय्य घोषित केलं आहे. तामिळनाडू आणि पुदुच्चेरीमधल्या चक्रीवादळाने प्रभावित भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रातर्फे मंत्र्यांचं एक पथक पाठवलं असल्याचंही गृहमंत्रालयाने सांगितलं आहे. राज्यांमधल्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी केंद्र सरकार नेहमीच राज्य सरकारांच्या पाठीशी उभं राहत असून यावर्षात आतापर्यंत केंद्र सरकारने विविध राज्यांना आपत्ती निवारणासाठी २१ हजार ७१८ कोटी रुपयांची मदत दिली आहे, असं गृहमंत्रालयाने म्हटलं आ...

December 2, 2024 1:36 PM December 2, 2024 1:36 PM

views 9

केरळ, तामिळनाडू आणि दक्षिण कर्नाटकात मुसळधार पावसाचा अंदाज

फेंजल चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असून, ते आज वायव्येकडे सरकण्याची आणि हळूहळू कमकुवत होण्याची शक्यता आहे. मात्र, या चक्रीवादळामुळं केरळ, तामिळनाडू आणि दक्षिण कर्नाटकात आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. दरम्यान, फेंजल चक्रीवादळामुळं पुद्दुचेरी इथं गेल्या तीस वर्षांतला सर्वात जास्त पाऊस पडल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. ते पूर्वपदावर यायला काही दिवस लागण्याची शक्यता आहे. काल संध्याकाळी पाऊस थांबल्यानंतर  बचाव आणि मदत कार्याला वेग आला आहे. भारतीय लष्कर, राष्ट्रीय आपत्ती प्रति...

November 27, 2024 1:27 PM November 27, 2024 1:27 PM

views 13

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तामिळनाडूच्या चार दिवसीय दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तामिळनाडूच्या चार दिवसीय दौऱ्यावर असून या दौऱ्यासाठी त्यांचं कोइम्बतूर विमानतळावर आगमन झालं. त्या उद्या वेलिंग्टन उटी इथल्या संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर २९ नोव्हेंबर रोजी निलगिरी इथल्या आदिवासींशी संवाद साधणार आहेत. राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी कोइम्बतूर आणि उटी परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.