December 20, 2024 6:05 PM December 20, 2024 6:05 PM
13
ताम्हिणी घाटात वऱ्हाडाच्या बसला झालेल्या अपघातात ५ जणांचा मृत्यू, १७ जण जखमी
रायगड जिल्ह्यात ताम्हिणी घाटात आज सकाळी एका खासगी बसला झालेल्या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला तर १७ जण जखमी झाले. ही बस पुण्याहून महाडच्या दिशेने लग्नाचं वऱ्हाड घेऊन निघाली होती. या बसमध्ये ३० ते ३५ प्रवासी होते. वाटेत ताम्हिणी घाटातल्या वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. जखमींवर माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.