January 2, 2026 1:32 PM January 2, 2026 1:32 PM

views 10

चीन विरोधात संरक्षण सिद्धता वाढवण्याचा तैवानचा निर्णय

चीनच्या विस्तारवादी आकांक्षांच्या विरोधात तैवानने आपल्या सार्वभौमत्वाच रक्षण करण्यासाठी संरक्षणसिद्धता वाढवण्याचा निश्चय केल्याचं तैवानच्या अध्यक्ष लाई चिंग ते यांनी म्हटलं आहे. चीनने आपल्या लष्करी सरावादरम्यान तैवानच्या दिशेने काही रॉकेट सोडल्याच्या घटनेनंतर त्यांनी हे विधान केलं आहे.   चीनच्या या कृतीमुळे तैवान आणि त्याच्या आसपासच्या  भागात विनाकारण तणाव वाढत असल्याचं अमेरिकन सरकारने म्हटलं आहे. तैवान हा  लोकशाही देश असून चीनने त्यावर लष्करी दबाव टाकू नये असं आवाहन अमेरिकेने केलं आहे.

December 29, 2025 6:47 PM December 29, 2025 6:47 PM

views 11

चीनच्या संयुक्त सेनासरावांचा तैवानकडून निषेध

तैवानच्या आसपास चीनने चालवलेल्या  संयुक्त सेनासरावांचा तैवानने निषेध केला आहे. तैवानच्या संरक्षम मंत्रालयाने समाजमाध्यमावरच्या पोस्टमधे म्हटलंय की चिनी सैन्याच्या या कवायती आंतरराष्ट्रीय प्रथांचं उल्लंघन असून शेजारी देशांना सैन्यबळाच्या वापराने भिववण्याचा प्रकार आहे. चीनची लढाऊ विमानं आणि जहाजं तैवानबोवती दररोज घिरट्या घालत असून त्याचं प्रमाण अलिकडे  वाढलं असल्याचं तैवानच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे.

November 10, 2025 6:29 PM November 10, 2025 6:29 PM

views 29

तैवानजवळ समुद्रात चीनने लष्करी हालचाली सुरु केल्याचं तैवानला आढळलं

तैवानजवळ समुद्रात चीनने लष्करी हालचाली सुरु केल्या असल्याचं तैवानला आढळलं आहे. चिनी सैन्याची ६ विमानं आणि नौदलाची ७ जहाजं आज सकाळी तैवानचं आखात ओलांडून गेल्याचं तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने  टिपलं असून कालही  १० विमानं आणि १० जहाजांच्या हालचाली टिपल्या , आणि त्याला प्रत्युत्तर दिलं असं तैवानने म्हटलं आहे. तैवान आणि चीन मधल्या आखातातली मध्यरेषा दोन्ही देशांची सरहद्द मानली जाते. मात्र अलिकडे चीनने त्याचं उल्लंघन वारंवार केल्यानं या क्षेत्रात तणाव निर्माण झाला आहे.

June 1, 2025 10:05 AM June 1, 2025 10:05 AM

views 18

तैवानला चीनकडून धोका असल्याचा अमेरिकेचा इशारा

अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी तैवानला चीनकडून लवकरच धोका निर्माण होणार असल्याचा इशारा दिला आहे. सिंगापूरमधील शांग्री-ला संवादात बोलताना हेगसेथ यांनी इशारा दिला की चीन आशियातील अनेक भागांवर वर्चस्व गाजवण्यासाठी आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याच्या आशेनं एक वर्चस्ववादी शक्ती बनण्याचा प्रयत्न करीत आहे.   अध्यक्ष शी जिनपिंग यांनी तैवानवर आक्रमण करण्यासाठी चिनी सैन्याला 2027 पर्यंतची अंतिम मुदत दिली आहे असा दावा करून, अमेरिकेच्या संरक्षण सचिवांनी आशियाई देशांना संरक्षण खर्च वाढवण्याचं ...

December 10, 2024 7:22 PM December 10, 2024 7:22 PM

views 21

चीनने गेल्या तीस वर्षांत आसपासच्या किनारी प्रदेशात घुसखोरी केल्याची तैवानच्या संरक्षण मंत्रालयाची माहिती

चीनने गेल्या तीस वर्षांत आसपासच्या किनारी प्रदेशात घुसखोरी केल्याची माहिती तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. चीनच्या किनारी भागातल्या समुद्रात गेल्या २४ तासांत ४७ विमानं आणि १२ युद्धनौका आढळून आल्या आहेत. यातल्या काही युद्धनौका ओकिनावा, तैवान आणि फिलिपीन्सना जोडणाऱ्या समुद्री भागात तैनात आहेत. या नौकांची संख्या जास्त असून या युद्धनौकांमुळे चीन आणि तैवानमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

October 14, 2024 2:18 PM October 14, 2024 2:18 PM

views 18

तैवानजवळ लष्करी कवायतींना सुरुवात

चीनने तैवानजवळ लष्करी कवायतींना सुरुवात केली आहे. तैवानने आपला राष्ट्रीय दिवस साजरा केल्याच्या दुसऱ्याच दिवशी या लष्करी कवायती होत आहेत. उत्तर, दक्षिण आणि पूर्व तैवानमध्ये सुरू असल्याचं चीनच्या संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. चीनची लष्करी विमानं आणि जहाजं तैवानला चहुबाजूंनी वेढत आहेत, तैवानच्या हवाई क्षेत्रात गस्त घालत आहेत, सागरी आणि जमीनीवरच्या तळांना लक्ष्य करत आहेत, असं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं आहे.   तर तैवानने चीनच्या या कृतीचा निषेध केला असून देशाचं स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाचं...