April 11, 2025 1:29 PM April 11, 2025 1:29 PM

views 10

२६-११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातला आरोपी तहव्वूर राणा याला १८ दिवसांची पोलिस कोठडी

२६-११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातला आरोपी तहव्वूर राणा याला १८ दिवसांची पोलिस कोठडी पटियाला हाऊन न्यायालयाने दिली आहे. तहव्वूर राणाचं काल भारताकडे प्रत्यार्पण झालं.   राष्ट्रीय तपास संस्थेचं पथक काल संध्याकाळी विशेष विमानानं त्याला घेऊन नवी दिल्लीत पोहोचलं. त्यानंतर त्याला पटियाला हाऊस न्यायालयात हजर करण्यात आलं. तहव्वूर राणा याला मुंबई हल्ल्याप्रकरणी २००९मध्ये अमेरिकेत अटक झाली होती. या हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड हेडली याला मदत केल्याचा ठपका त्याच्यावर आहे.   राणाचं प्रत्यार्पण हे कें...

April 9, 2025 9:26 PM April 9, 2025 9:26 PM

views 12

मुंबई २६/११ दहशतवादी हल्ल्यातला आरोपी तहव्वुर राणा भारतात येणार

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी तहव्वुर राणा याला भारतात आणलं जात असल्याचं वृत्त आहे. तो अमेरिकेतल्या तुरुंगात होता. भारतीय अधिकाऱ्यांनी त्याची कोठडी घेतली असून ते भारताकडे निघाले आहेत. काही महिन्यांपूर्वी राणा याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी मिळाली होती. या निर्णयाला आव्हान देणारी त्याची याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं काही काळापूर्वी फेटाळली होती. 

April 8, 2025 3:07 PM April 8, 2025 3:07 PM

views 12

२६/११ हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला भारताकडे सुपूर्द करण्याचा मार्ग मोकळा

२००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातला आरोपी तहव्वूर राणाच्या प्रत्यापर्णाचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची मागणी करणारा त्याचा अर्ज अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला आहे.  तहव्वूर राणा पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक असून सध्या तो लॉस एंजेलिस मधे डिटेन्शन सेंटरमध्ये आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात १९९७ मध्ये झालेल्या प्रत्यार्पण करारानुसार त्याला भारताच्या ताब्यात दिलं जाणार आहे.

March 7, 2025 1:46 PM March 7, 2025 1:46 PM

views 14

मुंबई अतिरेकी हल्ल्याचा आरोपी तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पण रोखण्यासाठीची याचिका फेटाळली

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा आरोपी तहव्वुर राणा याची भारतातल्या प्रत्यार्पण रोखण्यासाठीची याचिका अमेरिकेच्या न्यायालयाने फेटाळली आहे. भारतात आपलं प्रत्यार्पण केल्यास आपल्यावर अत्याचार केले जातील त्यामुळे हे प्रत्यार्पण रोखावे अशी मागणी त्याने केली होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याच्या वेळी त्याच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याच्या प्रत्यार्पणाला मंजूरी दिली होती. 

January 25, 2025 3:09 PM January 25, 2025 3:09 PM

views 17

मुंबई दहशतवादी आरोपी तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा

मुंबई दहशतवादी हल्ल्यातला महत्त्वाचा आरोपी तहव्वूर राणा याचा भारताकडे प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. राणा यानं भारताकडे प्रत्यार्पण करण्याविरोधात दाखल केलेली पुनर्विचार याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. या हल्ल्यातला मुख्य आरोपी डेव्हिड हेडली याचा राणा हा जवळचा सहकारी आहे. अमेरिकेच्या कनिष्ठ न्यायालयानं राणाच्या प्रत्यार्पणाच्या आदेशाला मान्यता दिल्यावर राणा यानं वरिष्ठ न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, राणासाठी ही अखेरची कायदेशीर संधी उपलब्ध असल्यानं तहव्वूर राण...