May 9, 2025 7:44 PM May 9, 2025 7:44 PM

views 11

२६/११ : आरोपी तहव्वूर राणा याला ६ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी

२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातला  आरोपी तहव्वूर राणा याला आज एनआयए  अर्थात राष्ट्रीय  तपास यंत्रणेच्या विशेष  न्यायालयानं  ६ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. २८ एप्रिल रोजी १८ दिवसांचा रिमांड संपल्यानंतर राणाला एनआयए कोठडी वाढवण्यासाठी न्यायालयात हजर करण्यात आलं. अमेरिकेतून भारतात  नुकतंच प्रत्यार्पण करण्यात आलेल्या राणावर २६/११ च्या हल्ल्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सूचना, माहिती आणि नकाशे असलेले हस्तलिखित नोट्स डेव्हिड  हेडलीला दिल्याचा संशय आहे.

August 18, 2024 7:00 PM August 18, 2024 7:00 PM

views 7

२६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा संशयित तहव्वुर राणाच्या भारतात प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा

२६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा संशयित तहव्वुर राणा याला भारतात पाठवण्याची परवानगी अमेरिकेच्या एका न्यायालयानं दिली आहे. भारत-अमेरिका प्रत्यार्पण कराराअंतर्गत राणाला भारताच्या ताब्यात देणं शक्य असल्याचा निर्वाळा न्यायालयानं दिला. भारतात पाठवण्याच्या हालचालींच्या विरोधात राणानं न्यायालयात धाव घेतली होती. सध्या तो याच प्रकरणात लॉस अँजेलिसच्या कारागृहात आहे. लष्कर-ए-तैय्यबाचा दहशतवादी डेव्हिड हेडली आणि पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयशी संबंध असल्याचा आरोपही तहव्वुर राणावर आहे.