August 3, 2025 2:19 PM

views 17

जागतिक टेबल टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मानूष शाह आणि दिया चितळे यांची लढत

ब्राझीलमध्ये फोज दो इगुआचू इथं सुरु असलेल्या जागतिक टेबल टेनिस स्टार स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज भारताच्या मानूष शाह आणि दिया चितळे यांची लढत जपानच्या सातोशी इडा आणि होनोका हाशिमोटो यांच्याशी होणार आहे.   भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री ९ वाजता हा सामना सुरु होईल. पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत काल भारताची अव्वल मानांकित जोडी मानव ठक्कर आणि मानूष शाह यांना जर्मनीच्या बेनेडिक्ट दुडा आणि डांग किउ यांच्याकडून २-३ असा पराभव पत्करावा लागला.

March 30, 2025 8:29 PM

views 25

WTT Star Contender Table Tennis: पुरुष एकेरीत भारताचं आव्हान संपुष्टात

चेन्नई इथं सुरु असलेल्या डब्ल्यूटीटी स्टार कंटेंडर टेबल टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताचं आव्हान आज संपुष्टात आलं. उपांत्य फेरीत भारताचा अव्वल मानांकित मानव ठक्कर याला फ्रान्सच्या बिगर मानांकित थिबॉल्ट पोरेट याच्याकडून पराभव पत्करावा लागला. थिबॉल्ट यानं मानवचा  १० - १२, ९ - ११, ११ - ७, ७-११ असा पराभव करत करत अंतिम फेरीत प्रवेश केला.  आता अंतिम फेरीत त्याची लढत दक्षिण कोरियाच्या ओह जून सुंग याच्यासोबत होणाल आहे.   मानव यानं काल दक्षिण कोरियाच्या लिम जोंग याच्यावर विजय मिळवून, तो या स्पर्धे...

November 10, 2024 5:00 PM

views 15

भारताच्या सिंद्रेला दासने इटलीतील WTT यूथ कंटेंडर स्पर्धेत १५ वर्षांखालील मुलींच्या एकेरीत विजेतेपद पटकावलं

क्रीडा जगतात, सध्या भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध खेळप्रकारांत घवघवीत यश मिळवत आहेत. इटलीत आयोजित टेबल टेनिसच्या डब्ल्यू.टी.टी. यूथ कंटेंडर या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सिंड्रेला दास हिनं पंधरा वर्षांखालील मुलींच्या एकेरी गटात किताब पटकावला आहे. विशेष म्हणजे अंतिम फेरीत सिंड्रेलानं प्रस्तिस्पर्धी असणाऱ्या भारताच्याच दिव्यांशी भौमिकला पराभूत करुन हे यश मिळवलं.   यासह, ऑस्ट्रेलियातल्या सिडनी इथं आयोजित न्यु साउथ वेल्स स्क्वॅश खुल्या स्पर्धेत अनाहत सिंह हिनं महिला एकेरीचं विजेतेपद पटक...

October 14, 2024 11:27 AM

views 14

आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय गटाला कास्य पदक

कझाकस्तानमधील अस्ताना इथे झालेल्या आशियाई टेबल टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरी गटात, उपांत्य फेरीत दाखल झालेल्या भारताच्या अह्यीका मुखर्जी आणि सुतीर्था मुखर्जी या जोडीने कास्य पदक जिंकत, इतिहास रचला आहे. या स्पर्धेत महिला दुहेरीत भारताने पहिल्यांदाच पदक पटकावलं आहे. उपांत्य फेरीत, या जोडीला जपानच्या मिवा हरिमोटो आणि मियुउ किहारा या जोडीकडून 0-3 ने पराभव पत्करावा लागला.