June 17, 2024 3:00 PM June 17, 2024 3:00 PM

views 24

टी- ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेकडून नेदरलँडचा ८३ धावांनी पराभव

टी- ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज श्रीलंकेने नेदरलँडचा ८३ धावांनी पराभव केला. श्रीलंकेने केलेल्या २०१ धावांचा पाठलाग करताना नेदरलँडचा संघ ११८ धावांवर गारद झाला. २१ चेंडूत ४६ धावा करणारा श्रीलंकेचा चेरित असालंका सामनावीरचा मानकरी ठरला आहे.   या स्पर्धेतल्या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने नेपाळला २१ धावांनी मात दिली. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशने नेपाळसमोर उभारलेलं १०६ धावांचं आव्हान पूर्ण करताना नेपाळचा संघ ८५ धावांवर ढेपाळला. या सामन्यानंतर बांगलादेशने सुपर ८ मध्ये आपलं स्थान पक्क...

June 14, 2024 2:39 PM June 14, 2024 2:39 PM

views 40

टी -२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तानकडून पापुआ न्यू गिनीचा सात गडी राखून पराभव

टी -२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज सकाळी त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अफगाणिस्ताननं पापुआ न्यू गिनीचा सात गडी राखून पराभव केला. पापुआ न्यू गिनीनं दिलेलं ९७ धावाचं आव्हानं अफगाणिस्ताननं तीन गडी गमावून पूर्ण केलं. काल झालेल्या सामन्यात इंग्लडनं ओमानला ८ गडी राखून हरवलं. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या ओमान संघाला इंग्लडनं केवळ ४७ धावांमध्येच गुंडाळलं. विजयासाठीचं ४८ धावांच माफक आव्हान इंग्लडनं केवळ ३ षटकात दोन गडयांच्या मोबदल्यात पूर्ण केलं.