July 7, 2024 8:33 PM July 7, 2024 8:33 PM
13
झिम्बाव्वे विरोधातल्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात भारताचा १०० धावांनी विजय
भारत आणि झिम्बाव्वे यांच्यात आज झालेल्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात भारतानं १०० धावांनी विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना, अभिषेक शर्मा यानं झळकावलेल्या पहिल्या शतकाच्या जोरावर भारतानं, झिम्बाव्वे समोर विजयासाठी २३५ धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र १९व्या षटकातच झिम्बाव्वेचा संपूर्ण संघ १३४ धावांत माघारी परतला. भारताच्या वतीनं मुकेश कुमार आणि आवेश खान यांनी प्रत्येकी ३ तर रवी बिष्णोई यानं २ गडी बाद केले. पाच सामन्यांच्या मालिकेला तिसरा सामन...