September 20, 2025 3:43 PM September 20, 2025 3:43 PM
19
आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये शंभर विकेट्स घेणारा अर्शदीप हा पहिला भारतीय खेळाडू
आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये शंभर विकेट्स घेणारा अर्शदीप हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. अबुधाबी इथं ओमानविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात त्याने टी-ट्वेंटीमधला आपला शंभरावा बळी घेतला. अर्शदीपचा हा सदुसष्ठावा आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी सामना होता. अफगाणिस्तानच्या राशिद खानने ५३ सामन्यांमध्ये तर श्रीलंकेच्या वनिंदू हसरंगाने ६३ सामन्यांमध्ये १०० बळींचा विक्रम केला आहे. अर्शदीप हा आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी सामन्यात 100 बळी घेणारा जगातला तिसरा सर्वात जलद गोलंदाज ठरला आहे.