July 6, 2024 2:58 PM July 6, 2024 2:58 PM

views 12

भारत विरुद्ध झिम्‍बाब्‍वे क्रिकेट सामना आज हरारे इथं होणार

भारत विरुद्ध झिम्‍बाब्‍वे होत असलेल्या पाच टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज झिम्‍बाब्‍वेत हरारे इथं होणार भारत विरुद्ध झिम्‍बाब्‍वे होत असलेल्या पाच टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज झिम्‍बाब्‍वेत हरारे इथं होणार आहे. शुभमन गिल भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे.   भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साडेचार वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारताचे रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या दिग्गज क्रिकेटपटूंनी टी-ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल...

July 1, 2024 1:32 PM July 1, 2024 1:32 PM

views 18

T-२० विश्वचषक विजेत्या पुरुष क्रिकेट संघासाठी बी.सी.सी.आय कडून, १२५ कोटी रुपयांची बक्षीसं जाहीर

टी-२० विश्वचषक चषकाला गवसणी घातलेल्या भारतीय पुरुष क्रिकेट संघासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं १२५ कोटी रुपयांच्या पुरस्कारांची घोषणा केली आहे. शनिवारी रात्री बार्बाडोस मधील भारताच्या विजयानंतर नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांनी भारतीय खेळाडूंचं अभिनंदान केलं आणि ही घोषणा केली.  

June 30, 2024 1:33 PM June 30, 2024 1:33 PM

views 15

T20 क्रिकेट विश्वचषक १७ वर्षांनी जिंकणाऱ्या भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव

टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक तब्बल १७ वर्षांनी जिंकणाऱ्या भारतीय संघावर चहूकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारताच्या या विजयानंतर देशभरात क्रिकेटप्रेमींच्या जल्लोषाला उधाण आलं होतं, मुंबई, चेन्नई, बंगळूरू, हैद्राबाद, दिल्ली या शहरांसह जागोजागी रस्त्यांवर तिरंगा फडकावत क्रिकेट प्रेमींनी विजयोत्सव साजरा केला.  भारतीय क्रिकेट संघाच्या या कामगिरीनं देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांचं हृदय जिंकलं अशा शब्दांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही संपूर्ण स्पर्ध...

June 28, 2024 3:04 PM June 28, 2024 3:04 PM

views 16

टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाची तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात धडक

टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत, गतविजेत्या इंग्लंडचा पराभव करुन भारतीय संघानं तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात धडक मारली आहे. पावसामुळे नाणेफेकीला उशीर झाल्यानंतर इंग्लंडनं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. फलंदाजीसाठी प्रतिकूल खेळपट्टीवर भारतीय संघानं पहिले दोन गडी झटपट गमावले, त्यानंतर पावसाने हजेरी लावली.   खेळ पुन्हा सुरू झाल्यानंतर रोहित शर्माच्या ५७ आणि सूर्यकुमार यादवच्या ४७ धावांच्या जोरावर भारतीय संघाने १७१ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी चोख कामगिरी बज...

June 28, 2024 12:01 PM June 28, 2024 12:01 PM

views 28

टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उद्या अंतिम सामन्यात भारताची दक्षिण आफ्रिकेशी लढत

टी२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत, उद्या गायना मध्ये भारताचा दक्षिण आफ्रिकेशी अंतिम सामना होणार आहे. काल भारताच्या फिरकी गोलंदाजांच्या भेदक माऱ्याच्या आणि कर्णधार रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडला माघारी पाठवत भारतीय संघानं तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात धडक मारली आहे.   पावसामुळं नाणेफेकीला उशीर झाल्यानंतर इंग्लंडनं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. पहिले दोन गडी झटपट गमावल्यानंतर, पावसाने हजेरी लावली. त्यानंतर मात्र रोहित शर्माच्या ५७ आणि सूर्यकुमार यादवच्या ४७ धावांच्...

June 22, 2024 10:21 AM June 22, 2024 10:21 AM

views 15

20 षटकांच्या विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या सामन्यात इंग्लंड पराभूत

20 षटकांच्या विश्वचषक स्पर्धेत सेंट लुईसा मधील ग्रॉस आईसलेट इथं झालेल्या सुपर आठ सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं इंग्लंडचा सात धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी निवडून दक्षिण आफ्रिकेनं विजयासाठी 164 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं होतं मात्र इंग्लंडला 20 षटकात सहा गडी बाद 156 धावा करता आल्या. विश्वचषकाचे सह-यजमान पद भूषविणाऱ्या वेस्ट इंडिजचा सामना अमेरिकेच्या संघाशी उद्या ब्रिजटाऊन इथं भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 6 वाजता होणार आहे.

June 19, 2024 2:50 PM June 19, 2024 2:50 PM

views 26

टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आजपासून सुपर आठ फेरीचे सामने रंगणार

आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आजपासून सुपर आठ संघांमधले सामने सुरू होणार आहेत. हे सर्व सामने वेस्ट इंडिज मध्ये खेळले जाणार आहे. यातला पहिला सामना आज अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघांदरम्यान खेळला जाणार आहे. सुपर आठ फेरीतला भारताचा पहिला सामना उद्या अफगाणिस्तान बरोबर होणार आहे. बांगलादेशने सर्वात शेवटी नेपाळवर विजय मिळवून सुपर आठ मधे प्रवेश केला आहे.