July 17, 2024 11:22 AM

views 28

आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय महिला संघ कोलंबोत दाखल

श्रीलंकेत डंबुला इथं येत्या शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या आशिया चषक टी ट्वेंटी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघ काल कोलंबोमध्ये दाखल झाला. हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची सलामीच्या सामन्यातच कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी गाठ पडणार आहे. स्पर्धेतील अ गटामध्ये भारत आणि पाकिस्तान शिवाय संयुक्त अरब अमिराती आणि नेपाळच्या संघांचा समावेश आहे. तर यजमान श्रीलंकेसह मलेशिया, थायलंड आणि बांगलादेश हे संघ ब गटात आहेत.