December 26, 2025 1:37 PM December 26, 2025 1:37 PM

views 14

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा टी-20 सामना आज तिरूवनंतपुरममध्ये

महिला क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध श्रीलंका तिसरा टी-ट्वेंटी सामना आज तिरूवनंतपुरम इथं होणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरूवात होईल. पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय महिला संघ दोन – शून्यने आघाडीवर आहे.

December 20, 2025 7:17 PM December 20, 2025 7:17 PM

views 1.1K

आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ साठी भारताचा संघ जाहीर

आगामी आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचं नेतृत्व सूर्यकुमार यादव याच्याकडे देण्यात आलं असून उपकर्णधारपद अक्षर पटेलकडे असेल. या संघाची घोषणा आज बीसीसीआयनं केली. इशान किशन आणि रिंकू सिंह यांनी संघात पुनरागमन केलं आहे. सलामीचे फलंदाज संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांची नावं नक्की झालं आहे. याशिवाय, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती यांचा समावेश संघात करण्यात आला आहे. शुभमन गिल याला दुखापतीच्य...

December 9, 2025 8:33 PM December 9, 2025 8:33 PM

views 80

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताची खराब सुरुवात

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या टी-ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज ओदिशात कटक इथल्या बाराबती मैदानावर सुरु आहे.  दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. भारताची सुरुवात खराब झाली. सामन्यातल्या तिसऱ्याच चेंडूवर शुभमन गिल ४ धावा काढून बाद झाला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या १४ षटकात ५ बाद १०४ धावा झाल्या होत्या. लुंगी नगिदीनं ३ गडी बाद केले. भारताच्या एकाही फलंदाजाला अर्थशतक झळकवता आलेलं नाही.     पाच सामन्यांच्या या मालिकेतला दुसरा स...

November 22, 2025 8:02 PM November 22, 2025 8:02 PM

views 42

दृष्टीहीन महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्व चषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी उद्या भारत आणि नेपाळ यांच्यात अंतिम लंढत

दृष्टीहीन महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्व चषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारत आणि नेपाळ यांच्यात अंतिम सामना होणार आहे.  स्पर्धेत आज कोलंबो इथं उपांत्य फेरीत झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर ९ खेळाडू राखून विजय मिळवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. नाणेफेक जिंकून भारतानं ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. त्यानंतर ऑस्ट्रेलियानं दिलेलं ११० धावांचं आव्हान भारतीय संघानं बाराव्या षटकात केवळ एक खेळाडू गमावून पार केलं.  त्यानंतर दुपारी झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्य...

November 16, 2025 8:09 PM November 16, 2025 8:09 PM

views 15

दृष्टिहीन महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा आठ खेळाडू राखून पराभव

दृष्टिहीन महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा आठ खेळाडू राखून पराभव केला. स्पर्धेतला हा भारताचा सलग पाचवा विजय ठरला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताननं, मेहरिन अली हिच्या ६६ धावांच्या खेळीच्या जोरावर सर्वबाद १३५ धावा केल्या. भारतानं पाकिस्तानचे सात खेळाडू धावबाद केले. त्यानंतर विजयासाठीचं १३६ धावांचं आव्हान भारतानं केवळ १० षटकांत दोन खेळाडूंच्या मोबदल्यात पार केलं. भारताच्या वतीनं अनेखा देवी हीनं सर्वाधिक ६४ धावा केल्या. अनेखा हिलाच सामना...

January 31, 2025 3:42 PM January 31, 2025 3:42 PM

views 13

T20 क्रिकेट : पुण्यात भारत आणि इंग्लड यांच्यात मालिकेतला चौथा सामना

भारत आणि इंग्लड यांच्यातल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज पुण्यात होणार आहे. संध्याकाळी सात वाजता हा सामना सुरू होईल. मालिकेत याआधी झालेल्या तीन सामन्यांपैकी भारतानं दोन तर इंग्लंडनं एका सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा भारताचा, तर बरोबरी साधण्याचा इंग्लंडचा प्रयत्न असेल. या मालिकेतला पाचवा आणि अखेरचा सामना येत्या २ फेब्रुवारी रोजी मुंबईत होणार आहे.

January 22, 2025 8:28 PM January 22, 2025 8:28 PM

views 10

इंग्लंडविरुद्धच्या टी-ट्वेंटी सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. कोलकात्यात ईडन गार्डन मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात शेवटची बातमी हाती आली तेव्हा इंग्लंडच्या १४ व्या षटकात ६ बाद ९७ धावा झाल्या होत्या.  सामन्यातल्या तिसऱ्याच चेंडूवर अर्शदीप सिंगनं फिल सॉल्टला शून्यावर तंबूत धाडलं. तर तिसऱ्या षटकात त्यानं बेन डकेटला ४ धावांवर बाद केलं. त्यानंतर कर्णधार जोस बटलरनं इंग्लंडचा डाव सावरला. भारतीय संघाचं नेतृत्व ...

July 27, 2024 8:19 PM July 27, 2024 8:19 PM

views 15

भारताविरुद्धच्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय

भारत आणि श्रीलंके दरम्यान तीन सामन्यांच्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ही मालिका खेळत आहे. सामन्याचं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या  १३ षटकांत २ बाद १४६ धावा झाल्या होत्या. सुर्यकुमार यादवं या सामन्यात अर्धशतक केलं.

July 19, 2024 7:28 PM July 19, 2024 7:28 PM

views 15

महिला आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत भारताचा आज पाकिस्तानशी सामना

महिला आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरुद्ध होत आहे. श्रीलंकेमध्ये दाम्बुला इथं रनगिरी दाम्बुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना होत आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.   दरम्यान, आज दुपारी झालेल्या स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात नेपाळने संयुक्त अरब अमिरातीच्या संघावर ६ गडी राखून विजय मिळवला आहे.  

July 19, 2024 12:12 PM July 19, 2024 12:12 PM

views 22

श्रीलंकेविरुद्ध 20 षटकांच्या तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये सूर्यकुमार यादव भारतीय संघाचं नेतृत्व करणार

श्रीलंकेविरुद्ध आगामी वीस षटकांच्या तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये सूर्यकुमार यादव भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. या महिन्याच्या 27 तारखेपासून ही मालिका सुरू होत आहे. दरम्यान, पुढच्या महिन्यात सुरू होणाऱ्या 50 षटकांच्या मालिकेसाठी याच संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा समावेश करण्यात आला आहे.   दोन्ही मालिकांमध्ये शुभमन गील संघाचा उपकर्णधार असेल. 20 षटकांच्या मालिकेसाठी भारतीय संघात यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे , अक्षर पटेल, वॉश...