December 24, 2024 7:53 PM December 24, 2024 7:53 PM

views 12

आयसीसी चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धेतल्या वेस्ट इंडिजविरोधातल्या दुसऱ्या सामन्यात भारत मजबूत स्थितीत

महिला क्रिकेटमध्ये आयसीसी चॅम्पियनशिप स्पर्धेचा दुसरा एकदिवसीय सामना आज वडोदरा इथं सुरू आहे. या सामन्यात हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वेस्ट इंडिज विरुद्ध खेळत आहे. आजच्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाच्या ५० षटकांमध्ये ५ बाद ३५८ धावा झाल्या. भारताकडून हरलीन देओल हिने सर्वाधिक ११५ धावा केल्या. तर स्मृती मंधाना हिने ५३, प्रतिका रावल हिने ७६ आणि जेमिमा रॉड्रिग्ज हिने ५२ धावा केल्या. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा वेस्ट इंडिजच्या  २९ षट...

October 12, 2024 8:45 PM October 12, 2024 8:45 PM

views 18

महिला क्रिकेट टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत न्यूझिलंडचा श्रीलंकेवर आठ गडी राखून विजय

महिला क्रिकेट टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत न्यूझिलंडने श्रीलंकेवर आठ गडी राखून विजय मिळवला. जॉर्जिया प्लिमरचं अर्धशतक आणि ऍमेलिया केर हिच्या नाबाद ३४ धावांच्या बळावर न्यूझिलंडने अठराव्या शतकात श्रीलंकेचं ११६ धावांचं आव्हान पार केलं.    त्याआधी श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत ५ गड्यांच्या मोबदल्यात ११५ धावा केल्या. श्रीलंकेकडून चमारी अटापट्टी हिच्या ३५ धावांचा अपवाद वगळता कोणत्याही फलंदाजाला विशेष खेळी  करता आली नाही. न्यूझिलंडच्या लेई कॅस्पेरेक आणि ऍमेलिया केर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

July 26, 2024 3:21 PM July 26, 2024 3:21 PM

views 11

टी-20 क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीत आज भारत आणि बांग्लादेशमध्ये लढत

श्रीलंकेत सुरू असलेल्या महिलांच्या टी-20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना बांग्लादेशसोबत होत आहे. बांग्लादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा बांगलादेशच्या १२ षटकांत ५ बाद ३७ धावा झाल्या होत्या.

July 21, 2024 7:17 PM July 21, 2024 7:17 PM

views 13

महिला आशिया चषक टी- ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारताचा संयुक्त अरब अमिरातीवर ७८ धावांनी विजय

  महिला आशिया चषक टी- ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज भारतानं संयुक्त अरब अमिरातीवर ७८ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित २० षटकात ५ गडी गमावून २०१ धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरनं ६६, तर रिचा घोषनं २९ चेंडूत नाबाद ६४ धावा केल्या. फाली वर्मानं ३७ धावांचं योगदान दिलं.   भारताच्या धावसंख्येचा पाठलाग करतान संयुक्त अरब अमिरातीला निर्धारित २० षटकात ७ गडी गमावून १२३ धावाच करता आल्या. कवीशा एगोडेगनं सर्वाधिक नाबाद ४० धावा केल्या. कर्णधार ईशा रोहित ओझानं ३८ धावा केल्या.   भारतात...

July 20, 2024 9:14 AM July 20, 2024 9:14 AM

views 17

टी- ट्वेंटी महिला क्रिकेट आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानला हरवत भारताची विजयी सलामी

महिलांच्या टी- ट्वेंटी क्रिकेट आशिया चषक स्पर्धेत काल आपल्या पहिल्या साखळी सामन्यात भारतानं पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला. श्रीलंकेतल्या दांबुला इथे काल झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत भारतीय महिला संघाला १०९ धावांचं आव्हान दिलं. भारतीय संघानं पंधराव्या षटकात तीन बळींच्या मोबदल्यात हे आव्हान सहज पार केलं. भारताचा पुढचा सामना उद्या संयुक्त अरब अमिरात संघाशी होणार आहे.