February 2, 2025 2:13 PM February 2, 2025 2:13 PM
9
T-20 क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील अंतिम सामना आज मुंबईत
भारत आणि इंग्लंड यांच्यातील मर्यादित वीस षटकांच्या मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना आज मुंबईत वानखेडे मैदानावर होणार आहे. आज संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. भारताने या मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली आहे. या मालिकेनंतर सहा फेब्रुवारीपासून पन्नास षटकांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे.