December 11, 2024 7:52 PM

views 12

अनेक दिवसांच्या संघर्षानंतर सिरीयाची राजधानी दमास्कस येथील जनजीवन पूर्ववत

अनेक दिवसांच्या संघर्षानंतर सिरीयाची राजधानी दमास्कस येथील जनजीवन पूर्ववत होत असून लोक त्यांच्या दैनंदिन कामासाठी घराबाहेर पडत आहेत, असं सिरीयाचे हंगामी प्रधानमंत्री मोहम्मद अल बशीर यांनी सांगितलं. बाहेर देशात गेलेल्या सिरीयन नागरिकांना परत आणणं ही आपली प्राथमिकत आहे असं बशीर म्हणाले. देशात स्थैर्य आणि शांतता प्रस्थापित करण्याची गरज असल्याचं अधोरेखित बशीर यांनी बशर अल असद यांच्या राजवटीतल्या अधिकाऱ्यांनाही सोबत घेऊन सार्वजनिक सेवा आणि संस्थांंचं कामकाज सुरळीत करू असं सांगितलं.  दरम्यान, मागील ४८...

December 10, 2024 9:48 AM

views 32

सिरियामधून आश्रय घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांचे अर्ज युरोपीय राष्ट्रांकडून प्रलंबित

सिरियामधून आश्रय घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांचे अर्ज युरोपीय राष्ट्रांनी प्रलंबित ठेवले आहेत. सिरियात बंडखोरांनी देशाचा ताबा घेतल्यानंतर अध्यक्ष बशर-अल-असाद यांनी पलायन केलं; त्यानंतर युरोपीय राष्ट्रांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सिरियामधल्या परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि तिथली राजकीय स्थिती स्पष्ट होईपर्यंत कोणताही निर्णय घेणार नसल्याचं जर्मनी आणि ब्रिटनकडून सांगण्यात आलं आहे. जर्मनीनं या वर्षी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सिरियातून आश्रय मागणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असून जर्मनीकडे आश्रय म...