March 8, 2025 8:40 PM March 8, 2025 8:40 PM

views 8

सिरियातल्या लष्कर आणि बंडखोर यांच्या संघर्षात मृतांची संख्या पाचशेवर

सिरियातल्या किनारी भागात लष्कर आणि बंडखोर यांच्यात सुरू असलेल्या लढाईत मरण पावलेल्यांची संख्या पाचशेवर पोहोचली आहे. यात १२० बंडखोर तसंच ९३ लष्करी जवान मरण पावल्याचं  ब्रिटनमधल्या सिरियन ऑब्जर्वेटरी फॉर ह्युमन राइट्स या संस्थेनं म्हटलं आहे. बशर अल असद यांच्या सशस्त्र समर्थकांनी सरकारविरोधात बंडखोरी केल्यामुळे ही लढाई सुरू झाली आहे. या हल्ल्यात ३३० नागरिक मृत्यूमुखी पडल्याचंही या संस्थेनं म्हटलं आहे.

March 4, 2025 1:52 PM March 4, 2025 1:52 PM

views 12

सीरियाच्या हवाई संरक्षण बटालियनवर इस्रायलचे हवाई हल्ले

इस्रायलनं तार्तुसजवळच्या सीरियाच्या हवाई संरक्षण बटालियनवर हवाई हल्ले केले आहेत. कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नसल्याचं सीरियाच्या सरकारी माध्यमांनी म्हटलं आहे. नुकसानीचा आढावा घेण्यासाठी सिरियन सिव्हिल डिफेन्सची पथकं तैनात करण्यात आली आहेत. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी दक्षिण सीरियाचं लष्करीकरण करण्याचं आवाहन केलं आहे, तर सीरियाचे हंगामी अध्यक्ष अहमद अल शारा यांनी नवीन सरकारला इस्रायलशी संघर्ष नको असल्याचं म्हटलं आहे.

January 6, 2025 1:25 PM January 6, 2025 1:25 PM

views 9

अमेरिकेनं लादलेले निर्बंध उठवण्याची सिरीयाची विनंती

अमेरिकेनं सीरियावर लादलेले निर्बंध उठवण्याची विनंती सीरियाचे परराष्ट्र मंत्री असद हसन अल-शिबानी यांनी केली आहे. सिरीयातील सामान्य नागरिकांचं जीवनमान पुर्वपदावर आणण्यासाठी हे निर्बंध शिथील कारावेत असं कतारच्या राजनैतिक भेटीदरम्यान ते म्हणाले. कतारचे पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री यांची त्यांनी काल भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. माजी अध्यक्ष बशर अल-असाद यांना बंडखोरीतून पायउतार व्हावं लागलं होतं मात्र त्यानंतर आता सीरियाचे अधिकारी आंतरराष्ट्रीय समर्थन मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. असद हसन अल-शि...

December 17, 2024 8:48 PM December 17, 2024 8:48 PM

views 7

सीरियामधे गेल्या काही दिवसात झालेल्या हिंसाचारात ८ लाख ८० हजारांपेक्षा जास्त लोक विस्थापित

सीरियामधे गेल्या काही दिवसात झालेल्या हिंसाचारात ८ लाख ८० हजारांपेक्षा जास्त लोक विस्थापित झाले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवतावादी व्यवहार समन्वय कार्यालयाने ही माहिती दिली. सुमारे ४० हजार विस्थापितांनी सीरियाच्या ईशान्य भागातल्या अडीचशे शिबिरांमधे आश्रय घेतला आहे. लेबनॉन – सीरिया सरहद्दीवर मोठ्या संख्येने विस्थापितांची ये-जा सुरु असल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं. सुमारे ६ टक्के  विस्थापितांना कोणत्या ना कोणत्या प्रकारचं अपंगत्व आलं आहे. या विस्थापितांना मानवतेच्या दृष्टीनं अन्न, पाणी, र...

December 7, 2024 11:22 AM December 7, 2024 11:22 AM

views 12

वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या नागरिकांना सीरियाचा प्रवास टाळण्याचा दिला सल्ला

पश्चिम आशियाई देशातली सद्यस्थिती लक्षात घेता, पुढील सूचना मिळेपर्यंत भारतीय नागरिकांनी सीरियाचा प्रवास टाळण्याचा तसंच शक्य असल्यास सिरियातून बाहेर पडण्याचा सल्ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिला असून, याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.