July 18, 2024 8:39 PM

views 21

स्वीडिश खुल्या टेनिस स्पर्धेतून भारताचा सुमित नागल बाहेर

स्वीडिश खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागलला आज सरळ सेट्समधे पराभूत झाल्यानं स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. पुरुष एकेरीच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाच्या मारियानो नावोननं त्याला ६-४, ६-२ असं पराभूत केलं. त्याआधी पुरुष दुहेरीतही त्याला त्याचा पोलीश जोडीदार कॅरोल ड्रझेविकी यांना पराभव पत्करावा लागला. फ्रान्सच्या अलेक्झांडर म्युलर आणि लुका वॅन हॅशे या जोडीनं त्यांच्यावर ६-३, ६-४ अशी सरळ सेट्समधे मात केली.

July 18, 2024 3:35 PM

views 15

स्वीडिश ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत सुमित नागलचा अर्जेंटिनाच्या मारियानो नॅव्होनशी लढत

स्विडीश ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या सुमित नागलचा सामना आज अर्जेंटिनाच्या मरियानो नवोने याच्याशी होणार आहे.स्विडनच्या बस्ताद टेनिस स्टेडियमच्या सेंटर कोर्टमध्ये आज दुपारी हा सामना होईल. त्याआधी मंगळवारी झालेल्या सामन्यात सुमित नागलने स्विडनच्या एलियास यमेर याला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता.