October 29, 2024 8:07 PM October 29, 2024 8:07 PM

views 8

भारतीय नौदलाचा नवोन्मेष आणि स्वदेशीकरण परिसंवाद कार्यक्रम स्वावलंबन २०२४

संरक्षण क्षेत्रात स्वावलंबनाला चालना देऊन संरक्षण  सामुग्रीची आयात कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न  असल्याचा पुनरुच्चार सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला. भारतीय नौदलाच्या नवोन्मेष आणि स्वदेशीकरण परिसंवाद, स्वावलंबन २०२४ या कार्यक्रमात ते आज बोलत होते. संरक्षण क्षेत्रात खासगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही क्षेत्रांचं समसमान योगदान असायला हवं असं संरक्षणमंत्र्यांनी अधोरेखित केलं. सशक्त संरक्षण औद्योगिक परिसंस्था उभारण्यासाठी सरकारने खासगी क्षेत्राला अनेक सवलती दिल्या आहेत, असंही राजनाथ सिंह यांनी सां...

October 11, 2024 8:26 PM October 11, 2024 8:26 PM

views 4

‘स्वावलंबन’ परिषद येत्या २८-२९ ऑक्टोबरला भारत मंडपममध्ये भरणार

भारतीय नौदलाची नवकल्पनांवर तसंच स्वदेशीकरणावर आधारित असलेली तिसरी ‘स्वावलंबन’ परिषद येत्या २८-२९ ऑक्टोबरला दिल्ली इथल्या भारत मंडपम मध्ये भरणार आहे. त्याबरोबरच नौदलाशी संबंधित  अत्याधुनिक संरक्षण सामग्रीचं प्रदर्शन भरेल. या परिषदेला संरक्षण तज्ञ,  नवप्रवर्तक, लघु उद्योजक, वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी तसंच भांडवल पुरवठादार उपस्थित राहणार आहेत. त्यांना उदयोन्मुख तंत्रज्ञान, भविष्यातल्या युद्धनीती, स्वदेशीकरण तसंच नवकल्पनांबाबत विचार विनिमय करण्याची संधी लाभणार आहे.