November 21, 2024 3:32 PM

views 10

स्वराज्य पक्षाचे उमेदवार अंकुश कदम यांच्यावर गुन्हा दाखल

ऐरोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले स्वराज्य पक्षाचे उमेदवार अंकुश कदम यांच्यावर काल कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. भाजपाचे माजी नगरसेवक शंकर मोरे यांचा मुलगा जयेश मोरे याला मारहाण केल्याची तक्रार मोरे यांनी केली होती. त्यावरून कदम यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.