January 3, 2025 9:54 AM January 3, 2025 9:54 AM

views 10

स्वप्नील कुसाळे, सचिन खिलारी यांना अर्जून पुरस्कार तर दीपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर, मुरलीकांत पेटकर यांचा जीवनगौरव पुरस्कारनं होणार सन्मान

केंद्रीय क्रीडा मंत्रालयातर्फे देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. ऑलिंपिकमधे दोन पदकं जिंकणारी नेमबाज मनु भाकर, विश्वविजेता बुद्धिबळपटू डी गुकेश, पॅरा ॲथलिट प्रवीणकुमार आणि हॉकीपटू हरमनप्रित सिंह यांना, यंदाचा मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळे याला अर्जुन पुरस्कार, तर नेमबाजी प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाला आहे. क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर झ...

August 21, 2024 1:20 PM August 21, 2024 1:20 PM

views 15

कोल्हापुरात नेमबाज स्वप्नील कुसळेचं जल्लोषात स्वागत

पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेतला कांस्यपदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसळे याचं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आज कोल्हापुरात जल्लोषात स्वागत करण्यात आलं. महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्यापासून निघालेल्या स्वागत मिरवणुकीत  नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. शालेय विद्यार्थी, खेळाडू  देखील सहभागी झाले होते.     

August 1, 2024 7:43 PM August 1, 2024 7:43 PM

views 12

नेमबाज स्वप्नील कुसळेवर अभिनंदनाचा वर्षाव…

ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत कास्यपदकाला गवसणी घालणारा नेमबाज स्वप्नील कुसळेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वप्नीलचं अभिनंदन केलं आहे. एकाच ऑलिम्पिकमध्ये भारतानं नेमबाजीत तीन पदकं मिळवण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. स्वप्नीलच्या समर्पण आणि चिकाटीमुळे जागतिक मंचावर संपूर्ण देशाला अभिमान वाटेल, अशी कामगिरी त्यानं केली असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे.   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल स्वप्नील कुसळेचं कौतुक केलं आहे....

August 1, 2024 7:26 PM August 1, 2024 7:26 PM

views 11

पॅरिस ऑलिंपिकमधे स्वप्नील कुसळेनं नेमबाजीत पटकावलं कांस्यपदक

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आजचा दिवस भारतीय खेळाडूंसाठी संमिश्र ठरला. भारताच्या स्वप्निल कुसळेनं पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजी प्रकारात आज कास्यपदकाला गवसणी घातली. त्यानं ४५१ पूर्णांक ४ दशांश गुणांची कमाई केली. चीनच्या युकुन लिऊ यानं सुवर्ण, तर युक्रेनच्या सेरही कुलिश यांनी रौप्यपदक पटकावलं. ५० मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजी प्रकारात ऑलिम्पिक पदक जिंकणारा स्वप्निल हा पहिला भारतीय नेमबाज ठरला आहे. तसंच पॅरिस ऑलिम्पिकमधलं भारताचं हे तिसरं कास्यपदक आहे. दुसरीकडे महिलांच्या ५० मीटर रायफल थ्...

August 1, 2024 5:25 PM August 1, 2024 5:25 PM

views 6

टीसीने मिळवले ऑलिम्पिक पदक…

रेल्वेत टीसी म्हणून काम आणि क्रीडाक्षेत्रातली अविस्मरणीय कामगिरी, हे वर्णन ऐकून कुणाची आठवण येते? मला माहितीये, तुमच्या मनात भारताचा कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचं नाव आलं असेल, बरोबर ना? आता, धोनीसोबतच आणखी एका भारतीय क्रीडापटूचं नाव या वर्णनाशी तंतोतंत जुळेल. स्वप्नील कुसळे. तो मध्य रेल्वेच्या पुणे विभागात तिकीट तपासक म्हणून काम करतो आहे. सध्या सुरू असलेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत त्यानं ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कास्यपदकाचा अचूक वेध घेतला आणि आणि भारताच्या पदकांची हॅटट्रिक साधली. भार...