January 12, 2026 1:32 PM
39
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी देशभरातून आदरांजली
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी आज देश त्यांना आदरांजली वाहत आहे. विवेकनंदांचा जयंती दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. भारतीय संस्कृतीने दिलेलं शाश्वत ज्ञान जगापर्यंत पोचवण्याचं महत्वाचं काम स्वामीजींनी केलं असं त्यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांचं पुण्यस्मरण केलं आ...