January 12, 2025 1:48 PM

views 20

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना राष्ट्रपती, प्रधानमंत्र्यांकडून अभिवादन

स्वामी विवेकानंद यांची आज १६३वी जयंती. अध्यात्मिक गुरु, तत्वज्ञ-विचारवंत आणि भारतीय संस्कृतीचे प्रणेते असलेल्या विवेकानंदांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून देशभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी केली जात आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आज स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. स्वामी विवेकानंद यांनी भारताचा संदेश पाश्चात्य जगापर्यंत पोहोचवला आणि देशवासियांच्या मनात आत्मविश्वास पेरला असं राष्ट्रपती म्हणाल्या. देशाची उभारणी करण्यासाठी, मानवतेची सेवा करण्यासाठ...