December 10, 2024 6:54 PM December 10, 2024 6:54 PM
3
स्वाहिद दिवसाच्या निमित्तानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली
आसाम चळवळीत स्वतःच्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या आणि अतुलनीय शौर्य गाजवणाऱ्या हुतात्म्यांना आज स्वाहिद दिवसाच्या निमित्तानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. त्यांचा दृढ निश्चय आणि निःस्वार्थ प्रयत्नांमुळे आसामच्या संस्कृतीची ओळख जतन करण्यात मदत झाली असून त्यांचे शौर्य प्रत्येकाला विकसित आसामसाठी कार्यरत राहण्यास प्रेरित करते, असंही ते म्हणाले.