September 25, 2025 2:53 PM September 25, 2025 2:53 PM

views 9

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता दिन साजरा

‘स्वच्छता ही सेवा’ या सध्या सुरु असलेल्या मोहिमेत आज पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता दिन साजरा होत आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी नवी दिल्ली इथं संरक्षण मुख्यालयात सफाई कर्मचाऱ्यांना सन्मानित केलं.  भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनीही आज दिल्लीतल्या स्वच्छता मोहिमेत भाग घेतला. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर पाटील आज राजधानी दिल्लीत कालिंदी कुंज घाट इथं स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले तर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी निर्माण भवन इथं स्व...