September 23, 2025 3:07 PM September 23, 2025 3:07 PM
25
‘स्वच्छता ही सेवा’ मोहिमेत सर्वांनी सहभाग घेण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन
स्वच्छता ही सेवा या मोहिमेत देशभरातल्या सर्वांनी सक्रियपणे सहभाग घ्यावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. स्वच्छता ही सामूहिक जबाबदारी असून हा उपक्रम देशाप्रति अभिमानाची भावना प्रतिबिंबित करणारा एक प्रेरणादायी उपक्रम असल्याचं प्रधानमंत्र्यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. येत्या २५ सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता स्वच्छता उत्सवात सहभागी होऊन श्रमदान करण्याचं आवाहनही प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशातून केलं आहे.