November 11, 2024 3:17 PM November 11, 2024 3:17 PM

views 20

स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृती चित्ररथाचं आयोजन

स्वीप या मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत केंद्रीय संचार ब्युरोच्या चित्ररथाला आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. मतदानाची टक्केवारी ७५ ते ८० टक्क्यापर्यंत वाढवण्यासाठी या चित्ररथाचा उपयोग होईल, असं जिल्हाधिकारी म्हणाले.   नंदुरबारमध्येही केंद्रीय संचार ब्युरो आणि निवडणूक आयोगामार्फत पाठवण्यात आलेल्या मतदान प्रचार रथाचा शुभारंभ जिल्हाधिकारी मिताली सेठी यांच्या हस्ते झाला. धाराशिव इथं देखील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं...

November 10, 2024 3:16 PM November 10, 2024 3:16 PM

views 15

रत्नागिरीत मतदार जनजागृतीसाठी मॅरेथॉनचं आयोजन

मतदार जनजागृतीसाठी आज रत्नागिरी शहरात मॅरेथॉन आयोजित केली होती. पोलीस मैदानातून सुरू झालेल्या या मॅरेथॉनची सांगता भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर झाली. विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सर्व नागरिकांनी ब्रँड अँबेसेडर म्हणून काम करावं, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलं. जिल्ह्यात पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या जास्त आहे, मात्र त्यांची मतदानाची टक्केवारी कमी असते, असं सांगत जिल्ह्यातली मतदानाची टक्केवारी वाढण्याकरता सर्वांनी मतदानात सहभागी होणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले.