August 13, 2025 3:11 PM August 13, 2025 3:11 PM
4
ऑलिंपिक पदक विजेता सुशील कुमारचा जामीन रद्द
सर्वोच्च न्यायालयानं ऑलिंपिक पदक विजेता सुशील कुमारचा जामीन रद्द केला आहे. कनिष्ठ राष्ट्रीय कुस्ती विजेता सागर धनखड याच्या हत्या प्रकरणातील तो प्रमुख आरोपी असून दिल्ली उच्च न्यायालयानं त्याला जामीन मंजूर केला होता. हा आदेश न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या पीठानं रद्द करुन एका आठवड्यात शरण येण्याचे आदेश सुशील कुमारला दिले आहेत.