October 30, 2025 8:10 PM
164
भारताचे पुढचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांची नियुक्ती
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे पुढचे सरन्यायाधीश असतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करणारी पोस्ट केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री अर्जून राम मेघवाल यांनी समाज माध्यमांवर केली आहे. त्यांची नियुक्ती २४ नोव्हेंबरपासून लागू राहील. सरन्यायाधीश न्यायमूूर्ती भूषण गवई यांचा कार्यकाळ २३ नोव्हेंबरला संपेल. त्यांनंतर त्यांची जागा न्यायमूर्ती सूर्यकांत घेतील. ते देशाचे ५३ वे सरन्यायाधीश असतील.