March 15, 2025 9:46 AM March 15, 2025 9:46 AM
10
प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या अंमलबजावणीत राज्य दुसऱ्या स्थानी
प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत आतापर्यंत 1 लाख 92 हजार 936 सौर उर्जा प्रकल्प बसवून महाराष्ट्रानं देशभरात दुसरं स्थान मिळवल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमावर दिली आहे. गेल्या वर्षी 13 फेब्रुवारी पासून सुरु झालेल्या या योजनेत देशभरात 10 मार्च 2025 पर्यंत 10 लाख 9 हजार सौर उर्जा प्रकल्प बसवण्यात आले. या योजनेत महाराष्ट्र आपलं योगदान देत राहील तसंच 2026-27 पर्यंत 1 कोटी कुटुंबांपर्यंत ही योजना पोहोचवण्याचं उद्दिष्ट असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.