December 25, 2025 6:58 PM December 25, 2025 6:58 PM
7
काँग्रेसचे जेष्ठ नेते सुरुपसिंग नाईक यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांच्या पार्थिवावर आज, नंदूरबारमधल्या नवापुर तालुक्यातल्या नवागाव या त्यांच्या मुळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. यावेळी सुरुपसिंग नाईक यांना हवेत बंदुकीच्या तीन फैरीझाडून मानवंदना देण्यात आली. सरकारचे प्रतिनिधी म्हणून राज्याचे राज शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल अंत्यसंस्काराला उपस्थित होते. यावेळी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातले मान्यवर आणि मोठ्या संख्येनं लोक उपस्थित होते.