January 6, 2026 1:19 PM January 6, 2026 1:19 PM
95
माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचं निधन
माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांच्या पार्थिवावर आज पुण्यात अंतिम संस्कार करणात येणार आहेत. कलमाडी यांचं वयाच्या ८२ व्या वर्षी आज निधन झालं. काही दिवसांपासून ते आजारी होते. भारतीय हवाई दलात वैमानिक म्हणून सेवा बजावताना त्यांनी १९६५ आणि १९७१ च्या युद्धात प्रत्यक्ष भाग घेतला होता. निवृत्तीनंतर ते राजकारणात सक्रीय झाले. १९८२ ते १९९६ अशी सलग १४ वर्षं, आणि नंतर १९९८ ते २००४ या कालावधीत ते राज्यसभेचे सदस्य होते. १९९६ मधे लोकसभेत निवडून गेले होते. काँग्रेसच्या सत्ताकाळात त्यांनी रेल्वे खात्याचं ...