July 20, 2024 3:19 PM July 20, 2024 3:19 PM
13
रांचीची सुरभी कुमारीला नीट-यूजी प्रवेशपरीक्षा पेपरफुटी प्रकरणी निलंबित
रांचीच्या राजेंद्र वैद्यकीय विज्ञान संस्थेनं एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या सुरभी कुमारीला नीट-यूजी प्रवेशपरीक्षा पेपरफुटी प्रकरणी निलंबित केलं आहे. तसंच परीक्षेच्या काळातल्या सुरभीच्या कृत्यांची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यांच्या समितीचीही स्थापना संस्थेनं केली आहे. केंद्रीय अन्वेषण संस्थेनं काल सुरभीला तिच्या वसतिगृहातून अटक केली होती. त्यानंतर पुढच्या चौकशीसाठी तिची रवानगी तीन दिवसांच्या सीबीआय कोठडीत करण्यात आली. चौकशीदरम्यान तिनं पेपरफुटीत आपला सहभाग असल्याची कबुली दिली आहे.