July 7, 2024 2:05 PM July 7, 2024 2:05 PM
8
सूरतमध्ये इमारत कोसळून ७ जणांचा मृत्यू
गुजरातच्या सूरतमध्ये औद्योगिक वसाहतीत काल सहा मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर एका महिलेला वाचवण्यात यश आलं आहे. या महिलेला रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलांनी रात्रभर मदत आणि बचावकार्य करून सहा पुरुष आणि एका महिला असे एकंदर सात मृतदेह बाहेर काढले आणि आज सकाळी मदत आणि बचाव कार्य थांबवण्यात आलं. झारखंडच्या देवघर जिल्ह्यात आज सकाळी दोन मजली इमारत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर सात जणांना वाचवण्यात यश...