March 23, 2025 8:59 AM March 23, 2025 8:59 AM
11
लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना न्याय्य पद्धतीने झाली पाहिजे – खा. सुप्रिया सुळे
लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना न्याय्य पद्धतीने झाली पाहिजे, अशी मागणी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्या काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. लोकसंख्येच्या आधारे मतदारसंघांची पुनर्रचना झाली तर कमी लोकसंख्येच्या राज्यांना, अधिक लोकसंख्येच्या राज्यांच्या तुलनेत कमी प्रतिनिधीत्व मिळेल, अशी शक्यता सुळे यांनी वर्तवली.