October 8, 2025 3:01 PM

views 329

शिवसेना पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्हासंदर्भातली १२ नोव्हेंबरला सुनावणी

शिवसेना पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्हासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्या याचिकेवर आता येत्या १२ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीपर्यंत होणार असून त्यापूर्वी या प्रकरणाची सुनावणी घ्यावी, अशी विनंती ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी ठाकरे यांच्या वतीनं केली. ही विनंती मान्य करून येत्या १२ नोव्हेंबर रोजी सुनावणी घेण्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.     शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्...

September 16, 2025 3:52 PM

views 204

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपर्यंत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं याआधी ठरवून दिलेली कालमर्यादा न पाळल्याबद्दल न्यायालयानं आज राज्य निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले आणि ३१ जानेवारी २०२६ पर्यंत सर्व निवडणुका घेण्याचे निर्देश दिले. यापुढे यासाठी आणखी मुदतवाढ दिली जाणार नाही, असंही न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या पीठानं स्पष्ट केलं. तसंच वॉर्ड पुनर्रचनेची प्रक्रिया या वर्षीच्या ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावी, असंही न्यायालयानं सांगितलं. या निवडणुका चार मह...

August 22, 2025 1:20 PM

views 49

दिल्लीतल्या भटक्या कुत्र्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

दिल्ली एनसीआर परिसरातले रेबीजची लागण झालेले आणि आक्रमक वृत्तीच्या कुत्र्यांना वगळता उर्वरित कुत्र्यांना नसबंदी आणि लसीकरण करून त्यांच्या पूर्वीच्या परिसरात सोडण्यात यावं, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती विक्रम नाथ, संदीप मेहता आणि एन. व्ही अंजारिया यांच्या पीठानं यापूर्वी भटक्या कुत्र्यांच्या स्थलांतराचे निर्देश दिले होते. मात्र आज त्यांनी आपल्या निर्देशांमध्ये बदल केला.   या नवीन निर्देशानुसार, भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्याला मनाई ...

August 14, 2025 8:13 PM

views 8

बिहारमध्ये मतदारयाद्यांमधून वगळलेल्यांची नावं प्रसिद्ध करायचे निवडणूक आयोगाला आदेश

बिहारमध्ये मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणानंतर मसुदा मतदारयाद्यांमधून वगळलेल्या ६५ लाख लोकांची नावं संकेतस्थळावर जिल्हानिहाय प्रसिद्ध करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज निवडणूक आयोगाला दिले. ही नावं का वगळली, हेसुद्धा यात नमूद करावं, ओळखपत्र क्रमांकानुसार ही कागदपत्रं शोधता यायला हवीत, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. ही यादी बिहारच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करायची आहे. तसंच अंतिम यादीत समाविष्ट करण्यासाठी या व्यक्तींनी अर्ज केल्यानंतर पुरावा म्हणून आधार क...

August 14, 2025 2:44 PM

views 13

दिल्लीतल्या भटक्या कुत्र्यांबाबतचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला

दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातली सगळ्या भटक्या कुत्र्यांना निवारा केंद्रांमध्ये हलवण्याच्या निर्देशाला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं आज निकाल राखून ठेवला. न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या पीठानं या विषयाची स्वतःहून दखल घेऊन दिलेल्या निर्देशांवर न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती एन. व्ही. अंजरिया यांच्या पीठानं सुनावणी घेतली. या कुत्र्यांना हलवण्याचे निर्देश यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या इतर पीठा...

August 7, 2025 1:15 PM

views 10

वादग्रस्त न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

वादग्रस्त न्यायमूर्ती  यशवंत वर्मा यांना पदावरुन हटवण्यासंदर्भात नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या निर्णयाला आव्हान देणारी वर्मा यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायमूर्ती दीपांकर दत्त आणि न्यायमूर्ती ए. जी. मसीह यांनीसांगितलं की, वर्मा यांना, अंतर्गत समितीच्या चौकशी प्रक्रीयेत सहभागी झाल्यानंतर समितीच्या निर्णयाला आव्हान देता येणार नाही.   न्यायमूर्ती यशवंत वर्मा दिल्ली उच्च न्यायालयात असताना त्यांच्या घराच्या आवारात मोठ्या प्रमाणात रोकड आढळल्यामुळे वादग्रस्त ठरले आहेत. 

August 5, 2025 8:21 PM

views 29

ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांना तिथल्या सर्वोच्च न्यायालयानं नजरकैदेत ठेवण्याचे आदेश

ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांना तिथल्या सर्वोच्च न्यायालयानं नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिलेत. विद्यमान अध्यक्ष लुला दा सिल्वा यांच्या विरोधात सत्ता बळकावण्याचा कट रचल्याच्या आरोपांवर सुनावणी सुरू असून, बोल्सोनारो यांनी न्यायालयाच्या अटींचे उल्लंघन केल्याचं आढळून आलं.   बोल्सोनारो यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास त्यांना ४० वर्षांपर्यंत जन्मठेप होऊ शकते.

July 28, 2025 3:11 PM

views 48

Supreme Court : न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या याचिकेवर सुनावणी

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी अंतर्गत चौकशी समितीच्या अहवालाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली.   या चौकशी प्रक्रियेत सहभागी झाल्यानंतर यावर तुम्ही प्रश्नचिन्ह कसं उपस्थित करू शकता? असा प्रश्न न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती ए.जी. मसीह यांच्या पीठानं न्यायमूर्ती वर्मा यांना विचारला. न्यायमूर्ती वर्मा यांच्या शासकीय निवासस्थानी मोठ्या प्रमाणात बेहिशोबी रोख रक्कम आढळल्याप्रकरणी ही चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर...

July 22, 2025 1:23 PM

views 71

7/11 Mumbai Blast : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला राज्य सरकारचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान

मुंबईत उपनगरी रेल्वेगाड्यांमध्ये २००६मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातल्या सर्व १२ आरोपींना निर्दोष मुक्त करण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.  या प्रकरणावर २४ जुलै रोजी सुनावणी होईल.  मुंबईत ११ जुलै २००६ रोजी लोकल गाड्यांमध्ये सात साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या बॉम्बस्फोटांमध्ये १८९ जण मृत्युमुखी पडले, तर ७०० हून अधिक जण जखमी झाले.    काल झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयानं सर्व आरोपींबाबतचा सत्र न्यायालयाचा निकाल रद्द करून त्यांची तातडीनं सुटक...

July 18, 2025 8:08 PM

views 18

वादग्रस्त न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

घरात रोकड आढळल्याने वादग्रस्त ठरलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी  सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. वर्मा यांच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या त्रिसदस्यीय अंतर्गत समितीच्या निष्कर्षाला आव्हान देणारी याचिका त्यांनी दाखल केली आहे. या समितीने पूर्वग्रहावर आधारित चौकशी केली असून आपल्याला बाजू मांडण्याची पुरेशी संधी दिली नाही असं त्यांचं म्हणणं आहे.    संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकार वर्मा यांच्या विरुद्ध महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव मांडण्याची शक्यता असताना ही याचिका दाखल झाली आहे.