July 18, 2024 5:30 PM

views 28

नीट यूजी पेपरफुटीप्रकरणी २२ जुलैला पुढील सुनावणी

नीट यूजी परीक्षा पुन्हा घ्यायची झाली तर त्याकरता ठोस कारणं हवीत असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. नीट युजी परीक्षेत गैरप्रकार झाल्याप्रकरणी दाखल ४० याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं हो मत व्यक्त केलं. पुढची सुनावणी २२ जुलै रोजी होणार आहे.   नीट युजी परीक्षेत गैरप्रकार झाल्यापरकरणी दाखल ४० याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण संस्थेनं आतापर्यंतच्या चौकशीचा अहवाल आज बंद लिफाफ्यातून न्यायालयासमोर सादर केला....

July 18, 2024 3:03 PM

views 43

नीट–युजी परीक्षा पुन्हा घेण्यासाठी ठोस कारणं हवीत – सर्वोच्च न्यायालय

नीट युजी परीक्षा पुन्हा घ्यायची झाली तर त्याकरता ठोस कारणं हवीत असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. नीट युजी परीक्षेत गैरप्रकार झाल्यापरकरणी दाखल ४० याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. या घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण संस्थेनं आतापर्यंतच्या चौकशीचा अहवाल आज बंद लिफाफ्यातून न्यायालयासमोर सादर केला. तो आताच जाहीर केला तर पुढच्या तपासावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असल्याचं सीबीआयने म्हटलं आहे. अशा प्रकारच्या परीक्षेत गैरप्रकार घडण्याचे गंभीर सामाजिक दुष्परिणाम होतात...

July 16, 2024 6:45 PM

views 25

राष्ट्रपती मुर्मू यांनी न्यायमूर्ती एन कोटीश्र्वर सिंग आणि आर महादेवन यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून केली नियुक्ती

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती एन कोटीश्र्वर सिंग आणि आर महादेवन यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. न्यायमूर्ती एन कोटीश्र्वर सिंग सध्या जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. तर न्यायमूर्ती आर महादेवन मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत.

July 16, 2024 2:51 PM

views 14

अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणी फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली

अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणी तपासासाठी विशेष तपास पथक किंवा तज्ज्ञांचं पथक नेमण्याची मागणी फेटाळून लावण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत फेरविचाराची विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळून लावली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पर्दिवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठानं हा निकाल दिला. संघटित गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार माहिती प्रकल्प म्हणजे ओसीसीआरपी आणि हिंडेनबर्ग संशोधन यांच्यासारख्या संस्थांनी दिलेले अहवाल सबळ पुरावा म्हणून ग्राह्य धरत...

July 15, 2024 7:21 PM

views 31

नीट यूजी 2024: राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं नव्यानं दाखल केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

नीट यूजी अर्थात, पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षा पेपर फुटीप्रकरणी राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं नव्यानं दाखल केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं आज संबंधित याचिकाकर्त्यांना नोटीस जारी केली. याप्रकरणी काही विद्यार्थ्यांच्या याचिका राजस्थान उच्च न्यायालयापुढे प्रलंबित आहेत. त्या सर्वोच्च न्यायालयाकडे वर्ग कराव्यात, असं राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या याचिकेत म्हटलं आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयानं, ही नोटीस बजावली आहे. मात्र राजस्थान उच्च न्यायालयापुढच्या प्रलंबित कार्यवाहीला स्थगिती देणार...

July 12, 2024 1:18 PM

views 34

दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य धोरण प्रकरणात सर्वोच्‍च न्‍यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर

सर्वोच्‍च न्‍यायालयानं ईडीने दाखल केलेल्या कथित मद्य धोरण प्रकरणात  दिल्‍लीचे  मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज अंतरिम जामीन मंजूर केला.  ईडीनं केलेल्या अटकेला आव्हान देणारी केजरीवाल यांची याचिका न्‍यायाधीश संजीव खन्‍ना आणि दीपांकर दत्‍ता यांच्या  खंडपीठानं मोठ्या खंडपीठाकडे पाठवली आहे. तथापि  केजरीवाल यांना या प्रकरणी गेल्या २५ जूनला सी बी आय नं अटक केली होती, या प्रकरणात त्यांना जामीन मिळाला नसल्यानं ते कारागृहातच राहतील.

July 8, 2024 7:14 PM

views 44

नीट युजी पेपर फुटी प्रकरणी अहवाल सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थेला आदेश

पेपर फुटीची व्याप्ती खूप मोठ्या प्रमाणावर असेल तरच फेरपरीक्षेचा विचार केला जाईल, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं आज नोंदवलं. नीट युजी पेपर फुटीच्या प्रकरणासंदर्भातला अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थेला दिले आहेत. या प्रकरणाच्या तपासाच्या प्रगतीचा अहवाल सादर करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला दिला आहे. हे दोन्ही अहवाल बुधवारी संध्याकाळपर्यंत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  नीटची फेरपरीक्षा घ्यावी अशी मागणी करणाऱ्या ...

June 24, 2024 8:03 PM

views 42

अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात येत्या बुधवारी सुनावणी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात येत्या बुधवारी सुनावणी होणार आहे. कथित मद्य धोरण प्रकरणात जामीन प्रकरणी उच्च न्यायालयानं निकाल राखून ठेवला होता. तसंच विशेष न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली होती. त्याला केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.

June 14, 2024 2:54 PM

views 26

नीट परीक्षेसंदर्भात दाखल याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या एनटीए, केंद्रसरकार, बिहार राज्यसरकार आणि सीबीआयला नोटिसा

वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय प्रवेशासाठीच्या नीट परीक्षेत पेपरफुटी आणि अन्य गैरप्रकार झाल्याचा आरोप करत त्याची केंद्रीय अन्वेषण संस्थेमार्फत चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय परीक्षा संस्था तसंच केंद्र सरकारला नोटिसा बजावल्या आहेत. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप महेता यांच्या सुट्टीकालीन पीठाने सीबीआय आणि बिहार राज्यसरकारकडूनही जबाब मागितला असून त्याकरता दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. नीट परीक्षेत पेपरफुटीचा आरोप करत त्याची सीबीआय चौकशी करण्या...